मध्य रेल्वेने रुळांच्या डागडुजीसाठी नेहमी प्रमाणे रविवारी मेगाब्लॉकचे आयोजन केले आहे. या आठवडाभर रेल्वे मार्गावरील लोकलची वाहतूक सुरळीत राहाण्यासाठी मेगाब्लॉकची गरज असते. त्यानुसार उद्या ७ जून रोजी मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर आणि आज शनिवारी रात्री मुख्य मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे प्रवास करण्याआधी मुंबईकरांनी लोकलचे मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.


मध्य रेल्वेने मुख्यमार्गावर शनिवारी ६ जून रोजी मध्यरात्री सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान स्पेशल नाईट ब्लॉक घेतला आहे.


CSMT आणि Vidyavihar अप आणि डाऊन धीम्यामार्गावर शनिवारी ६ जून रोजी रात्री 12.05 वा. ते सकाळी 05.05 वाजेपर्यंत


शनिवारी रात्री ११.३० वाजता डाऊन धिम्या मार्गावरील सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकल फेऱ्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील, यावेळी त्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि विद्याविहार स्थानकानंतर पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील


अप धिम्या मार्गावरील घाटकोपर स्थानकातून शनिवारी रात्री ११.२९ ते सकाळी ०५.०४ वाजताच्या दरम्यान सुटणाऱ्या लोकल फेऱ्या विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांना कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकादरम्यान थांबा देण्यात येईल.

शेवटची आणि पहिली लोकल

ब्लॉक सुरु होण्याच्या आधी शनिवारी ६ जून रोजी शेवटची डाऊन टिटवाळा लोकल सीएसएमटी, मुंबई वरुन रात्री ११.१६ वाजता सुटेल


ब्लॉक संपल्यानंतर रविवारी पहिली डाऊन कसारा लोकल सीएसएमटी, मुंबई हून सकाळी ५.०७ वाजता सुटेल


ब्लॉक सुरु होण्याच्या आधी शनिवारी ६ जून रोजी शेवटची अप टिटवाळा-सीएसएमटी लोकल कल्याणहून रात्री ११.२२ वाजता सुटेल


ब्लॉक संपल्यानंतर रविवारी पहिली अप टिटवाळा-सीएसएमटी लोकल कल्याणहून सकाळी ४.१२ वाजता सुटेल

हार्बर मार्गावर रविवारी दिवसाचा मेगाब्लॉक – लोकल फेऱ्या बंद

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवारी ७ जून रोजी सीएसएमटी ते चुनाभट्टी- वांद्रे स्थानकात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.


सीएसएमटी – चुनाभट्टी -वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० वा. ते दु.४.४० वाजता आणि चुनाभट्टी- वांद्रे – सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० वा.ते दु.४.१० वाजेपर्यंत.


सीएसएमटीवरून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ या वेळेत वाशी-बेलापूर- पनवेलकडे जाणाऱ्या आणि सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ या वेळेत वांद्रे-गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या ‘डाऊन’ हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या बंद राहतील.


सीएसएमटीवरून येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी १६.४३ पर्यंत सुटणाऱ्या वांद्रे-गोरेगावकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहतील.


पनवेल-बेलापूर-वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणाऱ्या सीएसएमटीसाठीची अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या आणि गोरेगाव-वांद्रे येथून सुटणाऱ्या सीएसएमटीसाठीच्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत रद्द राहतील.


रविवारी ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. रविवारी ब्लॉकच्या कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.


ट्रान्सहार्बर मार्गावर नो ब्लॉक 


उरण लाईनवर नो ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.