मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सध्या टी२० मुंबई लीग (T20 Mumbai League) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १५ वा सामना सोमवारी दुपारी मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स विरुद्ध ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट (MSC Maratha Royals vs Triumphs Knights MNE) संघात झाला.
या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadva) कर्णधार असलेल्या मुंबई नॉर्थ ईस्टने ६ विकेट्सने विजय मिळवला. सूर्यकुमारने विजयात मोलाचा वाटाही उचलला. पण त्यानंतर त्याने जी कृती केली, त्याने सर्वांचेच मन जिंकले आहे.
India T20I Squad: सूर्या ते हार्दिक... T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४ मॅच विनर्सलाच मिळाला डच्चू! एका फिनिशरचाही समावेशझाले असे की या सामन्यात मराठा रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी कराताना १९.५ षटकात सर्वबाद १५२ धावा केल्या. त्यांच्याकडून मॅक्सवेल स्वामीनाथनने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. तसेच चिन्मय सुतार ३२ धावांवर रिटायर्ड आऊट झाला. कर्णधार सिद्धेश लाडने २४ धावांचे योगदान दिले. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही.
मुंबई नॉर्थ ईस्टकडून सिल्व्हेस्टर डिसोझाने (Sylvester DSouza) अफलातून गोलंदाजी करताना मराठा रॉयल्सला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. त्याने ३.५ षटके गोलंदाजी करताना २१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. ज्यामुळे डिसोझाचा शिवम दुबे, बद्रे आलम, धुरमिल मटकर आणि रोहन राजे यांच्यासारख्या ५ विकेट्स घेणाऱ्या दिग्गजांच्या यादीत त्याचा समावेश झाला.
तसेच सागर मिश्राने २ विकेट्स घेतल्या, तर हितेश कदम आणि परीक्षित वलसंगकर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
Vaibhav Sooryavanshi: 'हेटर्स म्हणतील तू १५ वर्षांचा नाहीयेस...', विंडीजच्या दिग्गजाची पोस्ट चर्चेत; सूर्यकुमार यादवनेही केलं कौतुकत्यानंतर १५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई नॉर्थ ईस्टने सलामीवीर अखिल हेरवाडकर (५) आणि वेदांत मुरकर (११) यांच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या. पण नंतर नुतन कुमार गोएल आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरताना आक्रमक अर्धशतके केली. त्यांच्यात १०३ धावांची मोठी भागीदारीही झाली.
संघ विजयाच्या जवळ असताना नुतनला अर्थर्व भोसलेने ५६ धावांवर बाद केले. पण सूर्यकुमारने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाला १६ षटकातच ४ बाद १५३ धावा करून दिल्या. सूर्यकुमार ३६ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकारासह ७२ धावांवर नाबाद राहिला.
मराठा रॉयल्सकडून इरफान उमैर आणि अथर्व भोसले यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
View this post on Instagram
या सामन्यानंतर सूर्यकुमारला त्याच्या आक्रमक अर्धशतकाबद्दल सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. मात्र त्याने त्याला मिळालेला पुरस्कार सिल्व्हेस्टर डिसोझाला समर्पित केला, तसेच ट्रॉफी त्याला दिली. त्याच्या या कृतीने अनेकांची मनं जिंकली.
सूर्यकुमार म्हणाला, 'मला हा पुरस्कार सिल्व्हेस्टर डिसोझाला समर्पिक करायचा आहे आणि त्याला द्यायचा आहे. इथे चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे होते. खूप दमट आणि उष्ण वातावरण होतं. त्याने त्यातही पाच विकेट्स घेतल्या. टी२० क्रिकेटमध्ये ५ विकेट्स हे मोठे यश आहे. त्यामुळे मला त्याला माझ्यासोबत इथे बोलवायचे आहे आणि त्याला हा सामनावीर पुरस्कार द्यायचा आहे. तो गेल्या दीडवर्षांपासून खूप मेहनत करत आहे. त्याच्यासाठी ही योग्य संधी होती.'
संक्षिप्त धावफलक: मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स १९.५ षटकांत १५२ धावांवर सर्वबाद (मॅक्सवेल स्वामिनाथन ३६, चिन्मय सुतार ३२; सिल्व्हेस्टर डिसोझा ५/२१) पराभूत विरुद्ध ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट १६ षटकांत ४ बाद १५३ (सूर्यकुमार यादव नाबाद ७२, नूतन गोयल ५६; इरफान उमेर २/२३) ६ गडी राखून विजयी.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.