तुमसर (जि. भंडारा) : प्रेमसंबंध आणि माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक आणि संतापजनक घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला. नंतर त्या व्हिडिओच्या बळावर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली. मुलीने या नराधमांना कडाडून विरोध करताच, त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केली. याप्रकरणात गोबरवाही पोलिसांनी ५ आरोपींविरुद्ध ‘पोक्सो’ आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोबरवाही पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या गावात एका १५ वर्षीय पीडितेला आरोपी भावेश यादव (वय १९, रा. सिंडीकेट कॅम्प, डोंगरी माईन्स) याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. ती अल्पवयीन असल्याचे माहित असूनही २४ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री तो तिच्या घरी गेला. ते दोघे बेडरुममध्ये असताना आधीच दबा धरून बसलेले त्याचे मित्र क्षितीज पटले (वय १९), बाल्या उर्फ करण चौधरी (वय २१) आणि इतर दोन विधीसंघर्षग्रस्त मुले अचानक बेडरूममध्ये घुसली. यावेळी आरोपी क्षितीज पटले याने त्याच्या मोबाईलमध्ये त्या दोघांचा व्हिडिओ शूट केला.
Navi Mumbai: प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर वारंवार शरीरसंबंध; १५ वर्षीय मुलगी गर्भवती राहताच..., तरुणाच्या कृत्यानं खळबळव्हिडिओ काढल्यानंतर आरोपीने पीडिते गाठून, तो व्हिडिओ दाखवून भीती दाखवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, या जीवघेण्या प्रसंगातही पीडित मुलीने धैर्य दाखवून त्यांना स्पष्ट नकार दिला. आपली इच्छा पूर्ण होत नाही हे पाहून संतापलेल्या या नराधमांनी पीडितेची समाजात बदनामी करण्याच्या उद्देशाने तो आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
Kalyan Crime News : कल्याण हादरलं! 78 वर्षीय नराधम भोंदूबाबाचा 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पूजेच्या बहाण्यानं केलं काळं कृत्यव्हिडिओ व्हायरल झाल्याचे समजताच पीडितेने गोबरवाही पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ठाणेदार शरद शेवाळे यांच्या आदेशाने पोलिसांनी त्या नराधमांविरुद्ध कायद्याचा कठोर बडगा उगारून पाच जणांवर अत्याचार, लैंगिक छळ, पोक्सो, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन सज्ञान आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.