लातूर : जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या बैलाचा नुकताच वीज पडून मृत्यू झाला. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नवीन बैल खरेदी करण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांनी शेतीची मशागत करण्यासाठी स्वतःच्या पत्नीला अवताला जुंपल्याची धक्कादायक (Maharashtra farmer crisis 2026) घटना समोर आली आहे. या घटनेवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.


तुपकर यांनी म्हटले की, "ही घटना आमच्यापर्यंत पोहोचली तेव्हा अक्षरशः डोळ्यांत पाणी आले आणि महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. एका शेतकऱ्याला बैल घेण्याचीही ऐपत राहिलेली नाही, ही सरकारी व्यवस्थेच्या अपयशाची आणि सरकारच्या धोरणांची शोकांतिका आहे."


ते पुढे म्हणाले की, "एका बाजूला शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असून त्यांच्यासमोर जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बैल खरेदी करण्याइतकीही आर्थिक क्षमता अनेक शेतकऱ्यांकडे उरलेली नाही."

Kolhapur Highway Protest : 'आमची जमीन परत द्या, नाहीतर आम्हाला जेसीबीखाली घालून मारून टाका'; कोल्हापुरात शेतकरी आक्रमक, महामार्गाचे काम पाडले बंद

काशिनाथ गायकवाड यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मन हेलावून गेल्याचे सांगत तुपकर म्हणाले, "हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रात एका महिलेला बैलासारखे अवताला जुंपून शेतीचे काम करावे लागत असेल, तर ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. आपण नेमके काय साध्य केले, हा प्रश्न निर्माण होतो."


क्रांतिकारी शेतकरी संघटना गायकवाड कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे सांगत त्यांनी संघटनेचे पदाधिकारी लवकरच त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन सर्वतोपरी मदत करतील, असे आश्वासन दिले.





View this post on Instagram