PM Modi Speech : केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन आज 12 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त, नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) एक मोठी बैठक पार पडली. या बैठकीला एनडीए-शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी  यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. मी माझ्या आयुष्यात हा टप्पा गाठेन अशी कधी कल्पनाही केली नव्हती. या राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार आले आहेत. इतका प्रदीर्घ काळ भारतमातेची सेवा करण्याचे भाग्य केवळ देवाच्या विशेष कृपेनेच शक्य झाले. माझ्यासाठी जनताच देव आहे. या प्रेमाबद्दल मी सर्वांचा आभारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 


काँग्रेसच्या विश्वासघातानंतर जनतेने एनडीएवर विश्वास व्यक्त केला


पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या विश्वासघातानंतर जनतेने एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. 2014 पूर्वीची दशके मोठ्या अस्थिरतेने आणि गोंधळाने भरलेली होती. देशाला याचा मोठा फटका बसला, पण आता देशातील जनता एका स्थिर सरकारचे कार्य पाहत आहे आणि त्याच्या निर्णायकतेचे प्रशंसकही आहे. आज, मी देशातील महान जनतेला वंदन करतो आणि जनतेप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो.


एनडीए परिवार म्हणून आम्ही नेहमीच राष्ट्राचा विश्वास दृढ केला


एनडीए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, 2014 मध्ये जेव्हा एनडीए जिंकली, तेव्हा मी म्हणालो होतो की देशातील सामान्य माणसामध्ये एक नवी आशा निर्माण झाली आहे. ही आशा टिकवून ठेवणे ही आपल्या सर्वांवर एक मोठी जबाबदारी होती. काँग्रेसच्या विश्वासघातानंतर देशातील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला होता. आज मला समाधान आणि अभिमान वाटतो की, एनडीए परिवार म्हणून आम्ही नेहमीच राष्ट्राचा विश्वास दृढ केला आहे.


काँग्रेसने हजारो कोटी रुपयांचे घोटाळे केले


पंतप्रधान मोदी म्हणाले, की एनडीएच्या 12 वर्षांच्या कार्यकाळातील एक मोठे यश म्हणजे देश काँग्रेसच्या दुष्ट कारस्थानांतून मुक्त झाला आहे. काँग्रेसने देशाला असहाय्यता, हताशा आणि न्यूनगंडाच्या गर्तेत ढकलले होते असे मोदी म्हणाले. या काँग्रेसच्या विकास दरात सुशासन, धोरण, हेतू आणि निर्णयांचा अभाव होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा एनडीए सरकार सत्तेवर आले, तेव्हाच विकासाला कसा वेग येतो याची झलक आम्हाला मिळाली. पण दुर्दैवाने, 2004 मध्ये देश पुन्हा एकदा अस्थिरतेच्या वादळात आणि काँग्रेसच्या तावडीत सापडला. विकास तर सोडाच, काँग्रेसने देशाला एकापाठोपाठ एक हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यांमध्ये ओढले. 2014 मध्ये जेव्हा एनडीए सरकार सत्तेवर आले, तेव्हा देशाचे नशीब पुन्हा पालटले." जेव्हा हेतू, धोरण आणि निर्णयक्षमता हे सर्व एकत्र काम करतात, तेव्हा विकास कसा होतो हे देशाने पाहिले आहे.


जर 12 वर्षांत इतके काही घडू शकते, तर ते अनेक दशकांत का घडले नाही? पंतप्रधानांचा काँग्रेसला सवाल


जर 12 वर्षांत इतके काही घडू शकते, तर ते अनेक दशकांत का घडले नाही? हाच 'काँग्रेस विकास दर' आणि 'एनडीए विकास दर' यांच्यातील फरक आहे." एका व्यवस्थेमुळे लोकांना वाट पाहावी लागत होती. आजची व्यवस्था परिणाम दाखवते. एका व्यवस्थेमुळे कामात अडथळा येत होता आणि विलंब होत होता. आजची व्यवस्था सांगते, 'काम आता, वेळेवर आणि मोठ्या प्रमाणावर केले जाईल.' त्यामुळे, 2014 ते 2026 पर्यंतची कहाणी ही केवळ आकडेवारीची कहाणी नाही; ही अशा भारताची कहाणी आहे, ज्याने पहिल्यांदाच आपली पूर्ण क्षमता गाठण्याचा निर्णय घेतला आहे अस मोदी म्हणाले. 


 


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.