यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ मध्ये संपुष्टात येणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असलेल्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील दहा नगरपालिकांसह ढाणकी नगरपंचायतीच्या निवडणुका यंदाच्या सुरुवातीलाच पार पडल्या होत्या. आता बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, झरी आणि महागाव या सहा नगरपंचायतींचा कार्यकाळ पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये संपणार आहे. मुदतीत निवडणुका घेता याव्यात, यासाठी सहा महिने आधीपासूनच तयारी सुरू करण्यात येते.
Satara Gram Panchayat Elections : 874 ग्रामपंचायतींची रणधुमाळी लांबणीवर? मे-जूनमध्ये निवडणूक होणे का आहे अशक्य? प्रशासकीय हालचालींना वेगदरम्यान, आरक्षणासंदर्भात न्यायालयात दाखल याचिकेवर जुलै २०२६ मध्ये सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या अधीन राहून नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. लोकसंख्येच्या आधारावर नगरपंचायतींचे प्रभागांमध्ये विभाजन करणे ही निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाची बाब आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दींमध्ये कोणताही बदल करू नये, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती व सूचना मागविणे, प्राधिकृत अधिकारी नियुक्त करून सुनावणी घेणे, त्यांच्या शिफारशींचा विचार करून अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे, आरक्षण निश्चितीसाठी सोडत काढणे, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविणे, त्यांचा विचार करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, अशा विविध टप्प्यांचा समावेश असतो.
मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिमप्रभाग रचनेसाठी राज्य निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असून, विहित मुदतीत निवडणुका घेणे शक्य व्हावे, यासाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम तातडीने जाहीर करावा, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाने संबंधित यंत्रणांना पाठविले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.