पुणे : केशवनगर-मुंढवा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका २८ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला आहे.


सूरज रामेश्वर कोकाटे (वय २८, रा. जिंतूर, जि. परभणी, सध्या रा. मुंढवा) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हा त्याच्या दुचाकीवरून केशवनगर भागातील फ्लोरिडा इस्टेट सोसायटीच्या समोरील रस्त्यावरून जात होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरच्या चालकाने सूरजच्या दुचाकीला जोरात धडक दिली.


या अपघातात सूरज गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत सूरजचे वडील रामेश्वर शत्रुघ्न कोकाटे (वय ५८) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.