India Tour of Sri Lanka 2026: भारतीय क्रिकेट संघाला ऑगस्टमध्ये श्रीलंका दौरा करायचा आहे, हे याआधीच निश्चित झाले आहे. या दौऱ्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी चार फिरकी गोलंदाज भारतीय संघात असतील, असंही यापूर्वीच भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितले होते. पण या दौऱ्याला कधी सुरूवात होणार हे अद्याप निश्चित झालेले नव्हते. मात्र आता याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
Team India Schedule: IPL चा थरार संपला, आता भारतीय संघाचे कधी सुरू होणार सामने? पाहा पुढील १० महिन्यांचे वेळापत्रकक्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला १५ ऑगस्टला सुरुवात होणार आहे. गॉलमध्ये पहिला सामना खेळला जाईल. दरम्यान, दोन सामन्याची मालिका असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचाही भाग असल्याने दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. दोन्ही संघ गेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी शेवटपर्यंत शर्यतीत होते. यंदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेच्या पाँइंट्स टेबलमध्ये श्रीलंका २ सामन्यांत ६६.६७ च्या टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच भारतीय संघ ९ सामन्यांनंतर ४८.१५ च्या टक्केवारीसह ६ व्या क्रमांकावर आहे.
भारताने २०१७ नंतर श्रीलंकेत कसोटी मालिका खेळलेली नाही. त्यामुळे ९ वर्षांनंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर कसोटी मालिका खेळणार आहे. यापूर्वी शेवटच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला होता.
दरम्यान, अद्याप श्रीलंका क्रिकेट बोर्ड किंवा बीसीसीआयने या कसोटी मालिकेच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण या मालिकेली पहिला सामना १५ ते १९ ऑगस्टदरम्यान आणि दुसरा सामना २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान कोलंबोमध्ये होण्याची शक्यता आहे. तथापि, या कसोटी मालिकेसोबतच ३ टी२० मालिकाही खेळवण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबत यापूर्वीच बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी माहिती दिली होती.
IND vs AFG, ODI : रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? त्या Viral Video मुळे मिळालं स्पष्ट उत्तरश्रीलंकेतील लंका प्रीमियर लीग ९ ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे कसोटी मालिकेच्या आधी टी२० मालिका होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ही मालिका कसोटी मालिकेनंतर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावर सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्ड काम करत असल्याचे समजत आहे. त्यामुळे भारताच्या श्रीलंका दौऱ्याबाबत अधिकृत माहिती येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.