TMC MP Revolt : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यांचा पक्षाची शकलं होण्याची दाट शक्यता आहे. साधारण 58 आमदार त्यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. आमदारांच्या बंडानंतर आता खासदारदेखील बंड करणार असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तृणमूल काँग्रेसचे एकूण 19 खासदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. या खासदारांची यादीदेखील समोर आली आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत जवळ असणाऱ्या आणि विश्वासू असणाऱ्या काही खासदारांचाही यात समावेश आहे.
खासदारांनी दिले लोकसभा अध्यक्षांना पत्रमिळालेल्या माहितीनुसार तृणमूल काँग्रेसच्या 19 खासदारांनी बंड केले आहे. या सर्वच खासदारांनी एक पत्र लोकसभेच्या खासदारांना दिले आहे. या बंडखोर खासदारांच्या यादीत अभिनेता आणि राजकीय नेते शत्रूघ्न सिन्हा, माजी क्रिकेटर युसुफ पठाण, ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या सयोनी घोष यांचा समावेश आहे. खासदारांच्या या बंडाविषयी मात्र तृणमूल काँग्रेसने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.
बंडखोर खासदारांच्या यादीत कोणाकोणाचा समावेश?– काकोली घोष (बारासत)
– जगदीशचंद्र बसुनिया (कूचबिहार)
– खलीलूर रहमान (जंगीपूर)
– युसूफ पठाण (बहारमपूर)
– अबू ताहिर खान (मुर्शिदाबाद)
– पार्थ भौमिक (बराकपूर)
– बापी हलदर (मथुरापूर)
– सयोनी घोष (जादवपूर)
– माला रॉय (कोलकाता दक्षिण)
– मिताली बॅग (आरामबाग)
– दीपक अधिकारी (घाटाळ)
– कालीपद सोरेन (झारग्राम)
– जून मालिया (मेदिनीपूर)
– अरुप चक्रवर्ती (बांकुरा)
– डॉ. शर्मिला सरकार (वर्धमान पूर्व)
– शत्रुघ्न सिन्हा (आसनसोल)
– असितकुमार मल (बोलपूर)
– शताब्दी रॉय (बीरभूम)
– रचना बॅनर्जी (हुगली)
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.