वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 12 जून रोजी बर्मिंगहॅम येथे झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला मात दिली. या सामन्यात इंग्लंडने 219 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण श्रीलंकन संघ 132 धावांवर सर्वबाद झाला. हा सामना इंग्लंडने 87 धावांनी जिंकला. स्टार फलंदाज डॅनी व्याट-हॉजने एक शानदार शतक झळकावले. (Photo: ICC Twitter)
डॅनी व्याट हॉजने 62 चेंडूंमध्ये नाबाद 105 धावा केल्या. तिने 13 चौकार आणि एक षटकार मारला. हे तिचे तिसरे टी20 आंतरराष्ट्रीय शतक आणि टी20 विश्वचषकातील पहिले शतक आहे. या स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारी सातवी फलंदाज ठरली. तर हेदर नाईटनंतर शतक झळकावणारी दुसरी इंग्लंडची महिला खेळाडू आहे. (Photo: ICC Twitter)
डॅनी व्याटने 35 वर्षे आणि 52 दिवसांच्या वयात महिलांच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावलं. यासह सर्वात वयस्कर पूर्ण-सदस्य संघाची खेळाडू ठरली आहे. आतापर्यंत हा विक्रम श्रीलंकेच्या चमारी अटापट्टू यांच्या नावावर होता. तिने 2024 मध्ये वयाच्या 34 वर्षे आणि 164 दिवसांची असताना शतक झळकावले होते. (Photo: ICC Twitter)
डॅनी व्याट-हॉज या शतकासह वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विश्वचषकात इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. डॅनी 593 धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नॅट सायव्हर-ब्रंटच्या नावावर आहे, तिने आतापर्यंत 784 धावा केल्या आहेत. माजी कर्णधार शार्लट एडवर्ड्स 768 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo: ICC Twitter)
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.