नुकताच 'धमाल ४' या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला. यापूर्वीचे तीन भाग गाजल्यानंतर या फ्रँचायजीने आता चौथ्या भागाचा टीझर प्रादर्शित केलाय. या टीझरमध्ये कलाकाराची फौज पाहायला मिळतेय. अजय देवगण, संजीदा शेख, रितेश देशमुख, अर्शद वारसी, ईशा गुप्ता, संजय मिश्रा, ईशा गुप्ता, जावेद जाफरी यांसारख्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला 'धमाल ४' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या सिनेमाच्या टीझरमध्ये एक मराठमोळी अभिनेत्री देखील दिसलीये जिला अनेकांनी ओळखलंच नाहीये. कोण आहे ती?
यापूर्वी अनेक मराठी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. आता या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पोट धरून हसवणारी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेराव बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री नम्रता संभेरावची 'धमाल ४'मध्ये वर्णी लागली आहे. 'धमाल ४' मध्ये नम्रता छोट्या भूमिकेत दिसणार आहे, तिने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिलीये.
View this post on Instagram
A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)
तिने तिच्या चित्रपटाचा टीझर शेअर करत लिहिलं, 'धमाल ४' बॉलिवूड रे भैय्या...या लाफ्टर सिनेमाचा एक छोटा भाग आहे.' या पोस्टवर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं कौतुक केलं आहे. नम्रता संभेरावसोबत या सिनेमात विजय पाटकर आणि उपेंद्र लिमये हे मराठी कलाकारही दिसणार आहेत. येत्या १० जुलैला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
Inspector Manju: गावाकडच्या काकूंची सत्यावर माया; सेटवर येऊन चक्क सोन्याची वस्तू केली गिफ्ट!Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.