कराड (सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गादरम्यानच्या नांदलापूर ते कोल्हापूरनाका या तब्बल सव्वातीन किलोमीटर अंतरातील उड्डाणपुलाची उभारणी पूर्णत्वाकडे आली आहे. पूल सुरु होईपर्यंत वाहनधारकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्याअंतर्गत आज शनिवारी (ता. १३) दुपारी बारा वाजल्यापासून महामार्गावरील वाहतूक जाम (Karad traffic jam) आहे. कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाल्याने चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पुणे-बंगळूर महामार्गांतर्गत असलेल्या सातारा ते कागल या महामार्गाच्या सहापदरीकरण कामाला सुरुवात झाली आहे. त्या अंतर्गत सुरु असलेल्या कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाचे काम सध्या पूर्णत्वाकडे आले आहे. महामार्ग विभागाकडून उड्डाणपुलाखालील सर्व स्लीप रस्ते सुरु केलेले नाहीत. त्यासाठी अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांचाच वापर सुरु आहे.
Koyna Dam Water Level : महाराष्ट्रावर 1972 पेक्षाही भयंकर दुष्काळाचे सावट? सर्वात मोठ्या कोयना धरणात उरला फक्त 15 दिवस पुरेल इतकाच साठा, पाहा काय आहे स्थितीत्यामुळे वाहनधारकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महामार्गावरील कोल्हापूर नाका परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवारी आणि उद्या रविवारी (ता. १४) विकेंडसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मात्र याचा मोठा फटका सोसावा लागत आहे. कडाक्याच्या उन्हात वाहतूक जाम झाल्यामुळे वाहनात बसून राहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.