Nitin Gadkari Orders : दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आजरा शहरासमोरील टोल दुसरीकडे हलवण्यासाठी सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. आदमापूर येथील बाळूमामा मंदिराच्या भाविकांसाठी चांगल्या सुविधा उभारण्यास मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दिली.


ते म्हणाले, कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली ३० जूनची डेडलाईन पाळली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत ३६ हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा करून निधीची तरतूदही केली आहे. सध्या आचारसंहितेमुळे २५ जूनपर्यंत थांबावे लागणार आहे. त्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. रुग्णालयात स्ट्रेचर मिळण्यास उशीर झाल्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक चूक केली असेल, तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल.


टोल कायमचा मुक्त करा...


संकेश्वर-बांदा महामार्गावरील टोलबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे. यातून येथील टोल नाका हलवण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. पण, हा महामार्गच कायमचा टोलमुक्त करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी भूमिका संकेश्वर-बांदा टोलमुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.


संपत देसाई व परशराम बामणे म्हणाले, ‘संघर्ष समितीने टोलविरोधी भूमिका लावून धरली. यासाठी आंदोलने केली. दरम्यान, पालकमंत्री आबिटकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्याशी टोल हलवण्याबाबत चर्चा केली आहे. याला गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळावीत. पालकमंत्री आबिटकर यांनी टोलविरोधी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांना सर्व गोष्टी माहीत आहेत. आजऱ्याजवळील टोल हटवून तालुक्यातील जनतेला टोलमधून मुक्ती द्यावी अशी त्यांची भावना आहे. त्यांची भावना स्वच्छ आहे.’

Kolhapur Amboli Highway Toll Free : कोल्हापूर -आंबोली राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनांना टोल माफ, तहसिलदारांची माहिती

पण टोल हलवला तर तो कोठे करणार? तालुक्याबाहेर म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्‍ह्याच्या हद्दीत टोल नेल्यास त्यातून आजरा तालुकावासीयांना मुक्ती मिळणार काय? याशिवाय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी जीपीएस प्रणाली सुरू करण्याचे सूतोवाच केले आहे. तो प्रयोग या महामार्गावर राबवला जाणार का? याची स्पष्टता होणे गरजेचे आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन रस्ते विकास महामंडळ, टोल वसुली कंपनी व टोलविरोधी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींची बैठक घडवावी. अन्यथा हा रस्ता टोलमुक्त करावा, अशी मागणी केली. प्रभाकर कोरवी, संजय तर्डेकर, संजय घाटगे, विष्णू जाधव, आनंदा कुंभार, मारुती पाटील, काशिनाथ मोरे आदी उपस्थित होते.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.