मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी दोन हजार हेक्टरहून अधिक म्हाडाची जमीन आहे. त्यावर वेगवेगळ्या हौसिंग सोसायट्या असल्याने तरी त्या ठिकाणच्या दर्शनी भागातील जागा होर्डिंग उभारण्यासाठी भाडे तत्वावर देऊन महसूल निर्माण करायचा असा म्हाडाचा विचार आहे. त्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
मुंबईत म्हाडाच्या मोठ्या प्रमाणात जागा असून त्यावर केवळ ६० होर्डिंग असून त्यापैकी केवळ दोन होर्डिंग म्हाडाच्या दृष्टीने अधिकृत आहेत. तर उर्वरीत होर्डिंगला म्हाडाची एनओसी घेतलेली नाही. त्यामुळे म्हाडाचा महसूल बुडत आहे. त्या पार्श्वभूमीवर सदरची होर्डिंग अधिकृत करण्यासाठी मागील भाडे आणि चालू शुल्क भरण्याची योजना या आधीच म्हाडाने आणली आहे.
Navi Mumbai Electricity: अंधारात बुडालं खारघर, हजारो कुटुंबाचे हाल; अचानक वीज गेल्यानं लिफ्टमध्ये अडकले तरुण तरुणीत्यामुळे आता इतर ठिकाणी असलेल्या भूखंडाची दर्शनी भागातील जागा खासगी व्यवसायिकांना भाडे तत्वावर देण्याचा विचार असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्या माध्यमातून म्हाडाला वर्षाला सुमारे ८००-१००० कोटी रुपये भाडे मिळू शकेल अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
एक हजार कोटींचा वार्षिक महसूलम्हाडाच्या मुंबईत सुमारे २ हजार हेक्टर जमिनी आहेत. त्यापैकी अनेक जमिनी मोक्याच्या ठिकाणी आणि दर्शनी भागात आहेत. त्यामुळे सदर ठिकाणची जागा निश्चित करून होर्डिंगसाठी कंपन्यांना भाड्याने दिल्यास म्हाडाला भाड्यापोटी सुमारे एक हजार कोटी रुपये महसूल मिळू शकेल अशी माहिती म्हाडाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान सदरच्या जागा निश्चित करण्यासाठी व्यवसायिक एजन्सीची मदत घेता येईल का याबाबत म्हाडाकडून चाचपणी सुरू आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.