सचिन कदम, रायगड प्रतिनिधी
Raigad mother poisoning children case : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईने स्वतः विष प्राशन करण्यापूर्वी आपल्या पोटच्या चार लहान मुलांना थंडपेयातून (Cold drink) विष पाजल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आईसह तिच्या दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. तर २ मुलांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडीवर घडली आहे. आशा जाधव (वय २९ वर्षे) असे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या आईचे नाव आहे. या घटनेत आशा जाधव यांच्यासह त्यांची मुलगी नंदिनी जाधव (वय ७ वर्षे) आणि दुर्वा जाधव (वय ६ वर्षे) या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे.
Accident : राजनाथ सिंह यांच्या कुटुंबावर शोककळा; पुतण्याचा भीषण अपघातात मृत्यूथंडपेयातून दिले विष
आशा जाधव यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण पोलिसांच्या प्राथमिक तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आशा यांनी आधी आपल्या चारही लहान मुलांना थंडपेयामध्ये विष मिसळून प्यायला दिले. त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. काही वेळातच सर्वांची प्रकृती खालावल्याने हा प्रकार शेजाऱ्यांच्या आणि नातेवाईकांच्या लक्षात आला. सर्वांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच आई आणि दोन मुलींचा मृत्यू झाला.
Maharashtra Politics : शरद पवारांना केंद्रीय मंत्र्याची मोठी ऑफर; काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याऐवजी भाजपसोबत येण्याचे आमंत्रणदोन मुलांची प्रकृती गंभीर
या घटनेत आशा जाधव यांची इतर दोन मुले थोडक्यात बचावली आहेत. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या दोन्ही बालकांवर माणगाव येथील सरकारी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद करण्यात आली असून तपास सुरू केला आहे.
El Niño : मान्सून का रेंगाळला? 'एल निनो'चा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? पुण्यात पाऊस कधी कोसळणार? पाहा IMD चा अंदाजघटनेची माहिती मिळताच माणगावपोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. आशा जाधव यांनी टोकाचे पाऊल का उचलले? याचा शोध पोलीस घेत आहेत. खरवली आदिवासी वाडीवरील या सामूहिक आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
Gold Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा बदल, प्रति तोळा किती रूपयांना मिळणार? पाहा ताजे दरContact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.