-राजेंद्र व्यास


गंगापूर : गंगापूर-भेंडाळा फाटा -छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बाबरगाव फाट्याजवळ शनिवारी (ता. 13) सकाळी दहा ते सवा दहा वाजेच्या दरम्यान कंटेनर व दुचाकीच्या धडकेत तिघांचा (Gangapur accident) मृत्यू झाला. अपघातात दुचाकीवरील दोघांसह कंटेनर चालकाचा समावेश आहे.


याबाबत माहिती अशी की, संभाजीनगरकडून भेंडाळा फाटा-गंगापूर मार्गे शिर्डी येथे देवदर्शनास जाणाऱ्या स्कुटी क्रमांक MH 20 : HU 4407 ला समोरून येणाऱ्या कंटेनर क्रमांक KA 56 :8768 ने जोराची धडक देत लांब फरफट नेले. दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला, तर कंटेनर पलटी होऊन त्याचे मोठे नुकसान झाले.

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा वाद मिटणार? माजी मंत्र्यांनी सुचवला 'हा' 45 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक तोडगा, नागनाथअण्णांनी असं काय केलं होतं?

स्कुटीवरील डॉ. महादेव चंद्रकांत घुले (वय 30 रा. जालना) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या मीरा कडूबा पांडव (वय 23 रा. गुंडेवाडी ता. जि. जालना) या गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शूभम वाघमारे व सागर शेजूळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना मीरा पांडव यांचा मृत्यू झाला.

Koyna Dam Water Level : महाराष्ट्रावर 1972 पेक्षाही भयंकर दुष्काळाचे सावट? सर्वात मोठ्या कोयना धरणात उरला फक्त 15 दिवस पुरेल इतकाच साठा, पाहा काय आहे स्थिती

दरम्यान, हैद्राबादला माल घेऊन जाणारा कंटेनर कर्नाटकातील मंगलगी जि. बिदर येथील कंटेनर चालक राजकुमार देवेंद्र अप्पा (वय 46) यांचाही अपघातात मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस रिझवान शेख, प्रकाश सातपुते, विष्णू बापते यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.