Bangladesh cricketer claims assault by law enforcement: बांगलादेशचा कसोटी संघातील ऑफ-स्पिनर नईम हसन याला शनिवारी त्याच्या मूळ गावी चट्टोग्राम येथे एका पोलिसांकडून कथितपणे त्रास देण्यात आला. १२ जून रोजी ढाका येथील बीकेएसपी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या देशातील पारंपरिक लिस्ट ए स्पर्धेत प्राइम बँक क्रिकेट क्लबसाठी आपला शेवटचा सामना खेळून नईम घरी परतल्यानंतर रात्री उशिरा ही घटना घडली.


झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी त्याची बांगलादेशच्या संघात निवड झाली आहे. या कथित मारहाणीचा प्रसंग सांगताना तो प्रचंड घाबरलेला आणि हादरलेला दिसत होता. "प्रीमियर लीगचा सामना सुरू होता आणि विमानाला विलंब झाल्याने मी विमानतळावरून गाडीने येत होतो आणि रात्री साधारण ११:२५ वाजता पोलिसांनी लंकन बाजार उड्डाणपुलाखाली माझी गाडी थांबवली आणि चालकाकडून कागदपत्रे घेतली," असे नईमने पत्रकारांना सांगितले.

IND vs AFG 1st ODI: पावसाचा खोडा... भारत-अफगाणिस्तान मॅच केव्हा सुरू होणार? BCCI ने दिले अपडेट्स; सामना रद्द होणार?

"मी पोलिसांना म्हणालो, 'गरज पडल्यास तुम्ही माझी बॅग तपासू शकता,' पण त्यांनी माझा गळा पकडला आणि 'गाडीत बस' असे म्हणून मला त्यांच्या गाडीत बसवले. मी म्हणालो, 'तुम्ही माझा गळा का पकडला आहे?' पण त्यांनी मला बाहेर ढकलले आणि मग त्यांनी मला मारहाण केली आणि शिवीगाळ केली. मी एक राष्ट्रीय क्रिकेटपटू असून कसोटी सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतो, हेही मी त्यांना सांगितले. पण त्यांनी काहीच ऐकून घेतले नाही आणि जेव्हा त्यांना फोन आले व माझ्याबद्दल माहिती दिली गेली, तेव्हाच त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला," असे तो पुढे म्हणाला.


चट्टोग्राम महानगर पोलिस दलाचे उप पोलीस आयुक्त (उत्तर) अमीरुल इस्लाम यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगून, नईमला न्याय मिळेल असे आश्वासन दिले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. बीसीबीने म्हटले की,"बोर्ड खेळाडूशी झालेल्या अस्वीकार्य आणि अनुचित वर्तनाचा तीव्र निषेध करतो आणि हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत आहे. एका राष्ट्रीय खेळाडूशी अशी वागणूक होणे अत्यंत खेदजनक आहे आणि याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

KANE WILLIAMSON RETIRES: आता कोणाची फलंदाजी पाहायची? केन विलियम्सनच्या निवृत्तीने डोकं सून्न, क्रिकेटमधील एका 'सभ्य' युगाचा अंत!

नईमने बांगलेदशसाठी १४ कसोटीत ४८ विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७५ सामन्यांत त्याच्या नावावर ३०० विकेट्स आहेत. ८९ लिस्ट ए व ६९ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याने अनुक्रमे १११ व ५७ बळी टिपले आहेत.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.