-राम काळगे
निलंगा : खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असताना रासायनिक खतांच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. बियाणे, मजुरी, औषधे आणि इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे आधीच आर्थिक ताण सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता खतांच्या वाढलेल्या किमतीचे नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढणार असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर होत आहे. सध्या शेतकरी खरिप पेरणीच्या नियोजनाने चिंताग्रस्त झाला आहे.
MPSC Success Story: पीएसआयची संधी हुकली, पण हार मानली नाही; अखेर MPSC मधून निळकंठ गुडपळे महसूल सहाय्यकपदाला गवसणी, जिद्दीने गाठले यश..याबात मिळालेली माहिती अशी की, विविध खतांच्या दरात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. 15:15:15 या खताचा जुना दर एक हजार 650 रुपये होता, तो आता 2 हजार 50 रुपये करण्यात आला आहे. 10:26:26 या खताचा दर एक हजार 900 रुपयांवरून 2 हजार 250 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याचप्रमाणे 12:32:16 या खताचा दर 2 हजार 25 रुपयांवरून 2 हजार 400 रुपये करण्यात आला आहे. 20:20:0:13 या खताचा दर 1 हजार 450 रुपयांवरून थेट 2 हजार 200 रुपये करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, डीएपी आणि युरिया या खतांच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नसली तरी या खतांचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. अनेक कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांना डीएपी आणि युरिया उपलब्ध होत नसल्याने त्यांना इतर महागडी खते खरेदी करण्याची वेळ येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा खर्च वाढत असून खरीप हंगामाचे नियोजन कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्रांमध्ये जुन्या साठ्यातील खते नव्याने वाढलेल्या दराने विकली जात असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. जर या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने चौकशी करून खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी वर्षातील सर्वांत महत्त्वाचा कालावधी मानला जातो. अशा वेळी खतांची उपलब्धता व परवडणारे दर हे शेती उत्पादनासाठी अत्यावश्यक असतात. मात्र वाढत्या किमती आणि तुटवड्यामुळे शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एका बाजूला पावसाच्या अनिश्चिततेची चिंता, तर दुसऱ्या बाजूला वाढलेला शेती खर्च यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याबरोबरच दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. तसेच कृषी विभागाने जिल्ह्यातील खत विक्रेत्यांवर नियमित तपासणी मोहीम राबवून जुन्या साठ्याची नव्या दराने विक्री होत नाही ना, याची खातरजमा करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. त्यामुळे अन्नदात्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना दिलासा देणारे निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. खतांची सहज उपलब्धता, योग्य दर आणि प्रभावी नियंत्रण व्यवस्था निर्माण झाली तरच शेतकरी नव्या उत्साहाने खरीप हंगामाला सामोरे जाऊ शकेल. मात्र सध्या खरिप हंगामाच्या पूर्व तयारीसाठी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
MPSC Success Story भावाने उचलली शिक्षणाची जबाबदारी; बहिणीची जिद्दीच्या जोरावर MPSC मध्ये भरारी, पूजा घोडके यांचा प्रेरणादायी प्रवास.. सोयाबीन बियाणाचेही दर वाढलेबाजारात सध्या सोयाबीन बियाणाचे दर वाढले आहेत. तर नामवंत कंपण्याचे बियाणे मिळणे दुरापास्त झाले आहे. महाबीज कंपनीने वेगवेगळे वाण बाजारत आणले तरी शेतकऱ्यांनी विविध बियाणाची खात्री करून व पक्की पावती घेऊन खरेदी करण्याचे अवाहन कृषी विभागाने केले आहे. खताचा तुटवडा निर्माण करून चढ्या भावाने विक्री करणाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.