मुंबई : पुढील आठवड्यात शेअर बाजारात अनेक आयपीओ गुंतवणूकीसाठी खुले होणार आहेत. यामधील एक एसएमई आयपीओने उघडण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. आयपीओमधील किंमत बँडपेक्षा या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजीत आहेत. त्यामुळे लिस्टिंगलाच गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
जीएमपीनुसार प्रचंड नफ्याचे संकेत
सिरॅमिक टेबलवेअर आणि क्रॉकरी कंपनी क्ले क्राफ्ट इंडियाचाग्रे मार्केटमध्ये खळबळ माजवत आहे. शेअर्स १४ जून रोजी ६५ रुपयांच्या जीएमपीवर व्यवहार करत होता. याचा अर्थ आयपीओच्या वरच्या किंमत बँडनुसार कंपनीचे शेअर्स २६८ रुपयांवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच, गुंतवणूकदारांना ३२% पेक्षा जास्त म्हणजेच ३९,००० रुपयांचा लिस्टिंग नफा मिळू शकतो. किरकोळ गुंतवणूकदारांना २ लॉटवर ७८,००० रुपयांचा फायदा मिळू शकतो.
किंमत पट्टा
क्ले क्राफ्ट इंडियाचा आयपीओ १७ जून रोजी खुला होईल. गुंतवणूकदारांना १९ जूनपर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येईल. आयपीओद्वारे एकूण ११०. ११ कोटी रुपये उभारणारआहे. कंपनीने प्रति शेअर १९३ ते २०३ रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. लॉट आकार ६०० शेअर्स आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान २ लाॅट खरेदी करावे लागतील.
नवीन शेअर्सची विक्री
या मध्ये ५४. २४ लाख नवीन शेअर्सची विक्री केली जाईल. यातून मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी राजस्थानमधील मांडा येथे एक अतिरिक्त उत्पादन सुविधा उभारण्यासाठी करेल. उर्वरित निधीचा वापर कंपनीच्या भविष्यातील कामकाजाला बळकटी देण्यासाठी, सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी केला जाईल.
कंपनीचा व्यवसाय
क्ले क्राफ्ट इंडिया लिमिटेड ही भारतातील एक अग्रगण्य सिरॅमिक टेबलवेअर उत्पादक आणि वितरक आहे. ही कंपनी डिनर सेट, चहा आणि कॉफी सर्व्हिंग सेट, मग, टंबलर, प्लॅटर, बाऊल आणि इतर टेबलटॉप ॲक्सेसरीजसह विविध प्रकारच्या सिरॅमिक उत्पादनांची रचना, विकास, उत्पादन आणि विक्री करते. कंपनीची उत्पादने किरकोळ ग्राहक, संस्थात्मक खरेदीदार आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगाच्या गरजा पूर्ण करतात. कंपनी आपली उत्पादने 'क्ले क्राफ्ट' आणि 'जेसीपीएल' या ब्रँड नावांनी विकते.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.