सचिन बनसोडे, साम टीव्ही
शिर्डी: पश्चिम बंगाल येथून कुटुंबीयांसोबत शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या एका २० वर्षीय भाविक तरुणीचा साई संस्थानच्या भक्त निवासात विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून कंत्राटी सफाई कर्मचारी आरोपी अमन पठाण (रा. वाळकी, ता. राहाता) याच्या विरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यूमिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील रहिवासी असलेले एक कुटुंब ४ जून रोजी शिर्डीत दर्शनासाठी आले होते. ते भक्तनिवासमध्ये मुक्कामी होते. ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पीडितेचे आई-वडील आणि बहीण साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते, तर पीडिता रूममध्ये एकटीच होती. या दरम्यान, रूमची बेल वाजल्याने पीडितेने दरवाजा उघडला. समोर उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने (आरोपी) मला तुझ्याशी बोलायचे आहे, मी रूममध्ये येऊ का? अशी विचारणा केली.
तुकाराम मुंढेंचं धडाडीचं पाऊल; गुटखा उत्पादक, वाहतूकदार अन् पुरवठादारावर थेट मकोका; धाबे दणाणलेपीडितेने नकार दिला असता, त्याने तिला रूम नंबर २०४ जवळ येण्यास सांगितले. पीडिता तेथे गेली असता, आरोपीने तिचा हात धरून तिला रूममध्ये ओढले आणि तिच्याशी अश्लीलवर्तन करत विनयभंग केला. तसेच माझा मोबाईल नंबर ठेव, माझे नाव अमन पठाण आहे, असे सांगितले. पीडिता घाबरून ओरडत आपल्या रूममध्ये पळून आली.
Mumbai Pune : High-Speed रेल्वेचा ३८० प्रति किमीचा स्पीड, मुंबई ते पुणे प्रवास पूर्ण होणार फक्त ४८ मिनिटातया घटनेची माहिती मिळताच साई संस्थान प्रशासनाने तात्काळ पावले उचलत कंत्राटी सफाई कर्मचारी असलेल्या आरोपी अमन पठाण याला सेवेतून निलंबित केले आहे. दुसरीकडे, या घटनेमुळे शिर्डीत तीव्र संताप व्यक्त होत आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.