इंदापूर : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इंदापूर तालुक्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका युवकावर कारवाई करत त्याच्याकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाई रोहन उर्फ सोन्या महेंद्र चव्हाण असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी अवैध शस्त्रांचा वापर करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस फौजदार शिवाजी निकम, पोलिस हवालदार किशोर तेलंग, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, पोलिस अंमलदार गणेश डेरे व तुषार चव्हाण हे इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार गणेश डेरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.
त्यानुसार रोहन उर्फ सोन्या महेंद्र चव्हाण (वय 22, रा. काळठण नं. 2, ता. इंदापूर, जि. पुणे) यास ताब्यात घेण्यात आले.त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, एक मॅगझीन आणि सात जिवंत काडतुसे असा एकूण 26 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.