पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. 20 बंडखोर खासदारांची आज केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. त्यानंतर खासदार काकोली घोष दस्तीदार, सुदीप बंद्योपाध्याय आणि शताब्दी रॉय यांच्या नेतृत्वाखालील गटाने लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. आता या खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्ष आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात सक्रिय आहे. हे खासदार या पक्षात सामील झाल्यानंतर ते NDA ला पाठिंबा देणार असल्याचेही समोर आले आहे.
एनडीएला पाठिंबा देणारआज लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर काकोली घोष दस्तीदार यांनी सांगितले की, ‘टीएमसीमधून निवडून आलेलो आम्ही 20 खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटलो आणि स्वतंत्र गट म्हणून बसण्याची परवानगी मागणारे पत्र दिले. आमची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांपैकी दोन-तृतीयांशपेक्षा जास्त आहे. आम्ही नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीमध्ये विलीन होत आहोत आणि पुढे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एनडीएसोबत देशासाठी काम करू.’
NCPI मध्ये विलयबंडखोर खासदार सुदीप बंद्योपाध्याय यांनी सांगितले की, ‘आम्ही नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन होणार आहोत. त्यासाठीचा अर्ज लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे. 20 जुलैपूर्वी आमच्या गटाला स्वतंत्र कार्यालय आणि मान्यता मिळेल. त्यानंतर खरी तृणमूल काँग्रेस कोणाची, याचा निर्णय न्यायालय घेईल.’ याआधी या खासदारांनी टीएमसीमधील स्वतंत्र गट स्थापन करण्याचा दावा केला होता. मात्र आता त्यांनी स्वतंत्र गटाऐवजी NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.
या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेटआज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या बंडखोर खासदारांमध्ये काकोली घोष दस्तीदार, शताब्दी रॉय, सुदीप बनर्जी, सयानी घोष, माला रॉय, अरूप चक्रवर्ती, घाटलचे खासदार दीपक अधिकारी (देव), युसूफ पठाण, जून माल्या, प्रसून बनर्जी, शर्मिला सरकार, मिताली बाग, अबू ताहिर आणि खलिलुर रहमान यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या खासदारांसोबत भाजपचे निशिकांत दुबे देखील उपस्थित होते.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.