वुमन्स टीम इंडियाने आयसीसी टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडिया स्पर्धेतील सहाव्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत 2 गुणांची कमाई केली आहे. टीम इंडियाने बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानला 20 ओव्हरी खेळता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 17 षटकांमध्ये 106 धावांवर गुंडाळलं. भारताने यासह पाकिस्तानवर 64 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. टीम इंडियाचा वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील पाकिस्तान विरुद्धचा सातवा विजय ठरला आहे. तसेच टीम इंडियाने एजबेस्टन स्टेडियममध्ये पाकिस्तानला टी 20i क्रिकेटमध्ये पराभूत करण्याची ही चौथी वेळ ठरली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.