प्रत्येक नव्या भूमिकेत काही तरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करणारी अभिनेत्री पूजा सावंत या वेळी एका रहस्यमय कथेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक मिलिंद लेले यांच्या ‘दृश्य-अदृश्य’ या चित्रपटात ती तन्वी प्रधान ही व्यक्तिरेखा साकारत असून, भास आणि सत्य यांच्या सीमारेषेवर उभी असलेली ही भूमिका तिच्यासाठीही तितकीच वेगळी आणि आव्हानात्मक ठरली आहे.


रहस्यप्रधान कथांबद्दलची आपली विशेष आवड व्यक्त करताना पूजा म्हणाली, की ‘‘अभिनेत्री म्हणून मी सर्व प्रकारच्या भूमिका साकारण्यास उत्सुक असते; मात्र प्रेक्षक म्हणून गूढ आणि थरारक कथा सर्वाधिक भावतात. याच कारणामुळे ‘दृश्य-अदृश्य’ची कथा ऐकताच मी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला.’’

ओमानमध्ये जहाजावर भारतीयाचा मृत्यू, प्लास्टिकमध्ये गुंडाळून थंड पाण्याच्या बाटल्यांनी झाकलं; मृतदेह सडू लागला, मदत मिळेना

चित्रपटाविषयी बोलताना पूजा म्हणाली की, ‘‘या चित्रपटात ‘भास’ हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. एखादी घटना प्रत्यक्ष घडते आहे, की ती केवळ मनाचा भास आहे, यातील सूक्ष्म फरकच कथेला वेगळं आणि रंजक रूप देतो.’’ या भूमिकेचा अनुभव तिच्यासाठी विशेष ठरला.





View this post on Instagram