Jyoti Waghmare News : वनमंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद आणखी वाढला आहे. नवी मुंबई महापालिकेतील आरोग्य विषय सुविधांचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव टाकण्यात आले नाही. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यकर्ते, पदाधिकारी प्रचंड संतप्त झाले आहेत. काही कार्यकर्त्यांनी आज गणेश नाईक यांची गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न केला आहे.दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेच्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी नाईक यांच्यावर सडकून टीका केली.


खासदारवाघमारे म्हणाल्या, 'जे लोकं स्वतःच्या रक्ताला स्वतःचे नाव देऊ शकले नाही ते आमचं नाव काय देणार. तुम्ही निमंत्रण पत्रिकेवरील कागदावरील नाव पुसू शकाल पण आपल्या कामानं कोट्यवधी लोकांच्या काळजावर जे नाव कोरलं गेलं आहे ते तुम्ही कसं काढणार.



पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 'एखाद्या व्यक्तीची इर्षा, जलन, द्वेष आणि कोती मनोवृत्ती याच्यातून हे प्रकार घडतायेत. हे त्यांच्या चिंधी मानसिकतेचे परिणाम आहेत. तुम्ही आत्तापर्यंत काय नाव कमवलत, कधी महिलांचे शोषण, कधी नवी मुंबईचे डोंगर पोखरून, कधी तुमची घराणेशाही हुकुमशाही लोकांवर लादून, कधी संपत्तीचा निलार्ज दर्शन करत व्हाईट हाऊस बांधून तुम्ही फक्त बदनाम होण्याची कामं केली.',


'नाव कमावणं काय असतं किंवा जनतेचा आशीर्वाद घेणे काय असतं हे तुम्हाला नाही कळणार, तुम्ही आत्तापर्यंत लाज वाटतील अशीच कामं केलीत. कोणता माज आहे तुम्हाला? निमंत्रण पत्रिकेवर नाव न घातल्यामुळे कोणाच्याही कतृत्वाची उंची कमी होत नसते. मात्र, तुमच्या सारख्या कोत्या मनोवृत्तेचे दर्शन होते.', असा टोला देखील वाघमारे यांनी लगावला.

Shivsena News: शिवसेनेचे 16 आमदार आणि 7 खासदार फुटणार? मातोश्रीवरुन धडकला नवा आदेश; 22 जूनला मोठा निर्णय होणार..? म्हस्के, श्रीकांत शिंदेंचे नाव

कार्यक्रम पत्रिकेवर खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के या शिवसेनेच्या खासदारांची नावे आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नाही. ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मात्र त्यांचे नाव नसल्याने नाईक यांच्यावर टीका होत आहे. अशा प्रकारे नाव वगळले जात असेल तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देणार असा इशारा देखील नरेश म्हस्के यांनी दिला आहे.

Best Fixed Income Scheme : घरी बसल्या मिळणार 8.2% पर्यंत व्याज! 'या' सरकारी योजनांमध्ये मिळतोय बंपर परतावा

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.