मुरुड : येथील हॉलीबॉल चे राष्ट्रीय खेळाडू , मराठवाडा क्रीडा मंडळाचे सचिव तसेच प्रयोगशील शेतकरी रमेश सहालुगडे यांचे आज पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे अपघाती निधन झाले.


सोमवार ता. 15 जून रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास रमेश सहालुगडे हे आपल्या शेतात नवीन विहिरीचे काम पहात होते. विहिरीच्या कडेला आल्यानंतर अचानक पाय घसरून विहिरीत कोसळले. डोक्याला मार लागल्याने घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला. ते 60 वर्षाचे होते.रमेश सहालुगडे हे हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू होते.


अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. दिलीप दादा नाडे हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून नवीन खेळाडू तयार करण्याचे काम अद्यापही सुरू होते. हॉलीबॉल चे खेळाडू घडवण्यासाठी ध्यास घेतलेला व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. ते काही काळ मुरुड ग्रामपंचायत चे सदस्यही होते.


शेतीतही विविध प्रयोग करत असत. डाळिंबाचे विक्रमी उत्पन्न घेणारी शेतकरी अशीही त्यांची ओळख होती. घटनेची माहिती समजताच शहरातील सर्व स्तरातील लोक रुग्णालयात जमा झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे त्यांच्यावर मंगळवारी अंत्यविधी करण्यात येणार आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.