India A vs Sri Lanka A, ODI Match: सोमवारी (१५ जून) भारतीय अ संघाला श्रीलंकेतील तिरंगी वनडे मालिकेत सलग दुसर्या पराभवाचा सामोरे जावे लागले. डंबुलाला सुरू असलेल्या या मालिकेत सोमवारी भारतीय अ संघाला श्रीलंका अ संघाने रोमांचक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. पण या सामन्यात भारताला एक मोठी चूक महागात पडली आहे. या सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडीही घडल्या.
IND A vs SL A : वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूंमध्ये मोठा राडा, भारताच्या पराभवनंतर मैदानात ड्रामा, Viral Videoया सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. भारताने प्रभसिमरन सिंग (११) आणि वैभव सूर्यवंशी (२१) या सलामीवारांच्या विकेट्स लवकर गमावल्यानंतर उपकर्णधार ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार तिलक वर्मा यांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला होता.
पण खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर तिलक २३ धावांवर बाद झाला, तर ऋतुराजनेही ३७ धावांवर विकेट गमावली. आयुष बडोनी (१५), निशांत सिंधू (६) आणि अनुकूल रॉय (८) हे देखील स्वस्तात बाद झाले. पण सूर्यांश शेडगे (Suryansh Shedge) आणि विपराग निगम (Vipraj Nigam) यांनी शतकी भागीदारी केल्याने भारताने अडीचशेचा टप्पा पार केला.
सूर्यांशने ६६ चेंडूत ७२ धावा केल्या, तर विपरागने ४९ चेंडूत ५१ धावा केल्या. त्यामुळे भारताने ४९.२ षटकात सर्वबाद २६५ धावा केल्या. श्रीलंकेकडून विजयकांत वियासकांत आणि मोहम्मद शिराज यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
भारताला महागात पडली ती चूकदरम्यान, भारताचा विपराज निगमकडून दोनचा मोठी चूक झाली. झाले असे की ३३ व्या षटकात अनुकूल रॉयला आधीच खेळपट्टीमधून धावल्याने ताकीद मिळाली होती. पण नंतर विपराजकडूनही दोनदा अशीच चूक झाली.
त्यामुळे पंचांनी कारवाई केल्याने दोन चूकांसाठी ५-५ अशा धावा १० धावांची पेनल्टी (10 Runs Penalty) भारताला बसली. परिणामी श्रीलंका संघ जेव्हा फलंदाजीला उतरला. तेव्हा एकही चेंडू खेळण्यापूर्वीच त्यांच्या खात्यात १० धावा जोडल्या गेल्या होत्या. म्हणजे श्रीलंकेने धावांचा पाठलाग बिनबाद १० धावांपासून पुढे चालू केला.
IND A vs SL A, ODI: शेवटच्या चेंडूवर मोठा ड्रामा अन् मग सुपर ओव्हरचा थरार... अखेर भारताचा सलग दुसरा पराभव; आता फायनल कशी गाठणार?मात्र शेवटी ही चूक भारताला महागात पडली कारण श्रीलंकेनेही ५० षटकात ९ बाद २६५ धावाच केल्या आणि सामना बरोबरी सुटला. सदिरा समरविक्रमाने ९३ धावांची मोठी झुंज दिली. सामन्यात बरोबरी झाल्यानंतर सुपर ओव्हर झाली.
विशेष म्हणजे पंचांनी सुपर ओव्हर घेण्यात रस दाखवला नव्हता, पण निकाल लागेल या आशेने भारताचा कर्णधार तिलक वर्मा बराच वेळ पंचांशी वाद घालताना दिसला, जेणेकरून सुपर ओव्हर होईल.
अखेर सुपर ओव्हर झाली. पण त्यातही श्रीलंकने दिलेल्या १७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यांश शेडगे आणि वैभव सूर्यवंशी यांना मिळून १० धावाच करता आल्या. भारताच्या पराभवानंतर श्रीलंकेने जोरदार सेलिब्रेशन केले, यावेळी वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये वादही झाले. दरम्यान, जर पेनल्टीच्या १० धावा लागल्या नसत्या, तर कदाचित हा सामना भारतीय संघ जिंकू शकला असता.
आता भारताला हा सामनाही गमवावा लागल्याने अफगाणिस्तानविरुद्ध होणार्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे, तरच भारताचे अंतिम सामन्यासाठी आव्हान कायम राहिल. अफगाणिस्तान अ संघाने भारतीय अ संघला साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात पराभूत केले होते.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.