अनेकांसोबत असं होतं की, ते प्रचंड कष्ट करतात, परंतु त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. हातात आलेला पैसा हा कोणत्या न कोणत्या कारणांमुळे लगेच खर्च होतो आणि महिन्याच्या शेवटी बँक खातं रिकामं असतं. अनेक लोक जाणीवपूर्वक पैशांची बचत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यामध्ये त्यांना यश येत नाही. पैशांची बचतच होत नाही. असं का घडत असेल? याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे. तर त्यामागे तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतो. त्याबाबतच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
वास्तुदोष नेमका कशामुळे तयार होतो?
आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही चुका करत असतो, त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष तयार होतो. उदाहरण द्यायचं झालं तर वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तुंची दिशा ही ठरलेली असते. जर त्या -त्या दिशेला ती -ती वस्तू ठेवली गेली नाही तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. जसं की वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, की देवाचा फोटो कधीही दक्षिण दिशेला नसावा, मात्र अनेकजण देवी देवतांचे फोटो हे नकळत दक्षिण दिशेला लावतात. तसेच आपल्या पूर्वजांचे फोटो हे दक्षिण दिशा सोडून इतर दिशांना लावू नये, असं देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे, परंतु ते अनेकदा इतर ठिकाणी लावले जातात. अशा चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. जेव्हा एखाद्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा अशा घरात कधीही पैसा टिकत नाही, आज आपण वास्तुदोष दूर करण्याचे काही उपाय जाणून घेणार आहोत.
जर तुमच्या घरात पैसा टिकत नेसल तर तुम्ही तुमच्या पाकिटात नेहमी काही लवंगा ठेवू शकता. यामुळे तुमच्याभोवती जी नकारात्मक शक्ती असते ती दूर होण्यास मदत होते, त्याचा तुम्हाला फायदा होतो.
जर तुम्हाला पितृदोष असेल तरी देखील तुमच्या घरात पैसा टिकत नाही, पितृदोष दूर करण्यासाठी हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेले विविध उपाय तुम्ही करू शकतात.
या उपायांसोबतच अनावश्यक खर्चावर आळा घालण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले पाहिजेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.