वसईत पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं
पोलिसाने कौटुंबिक वादातून आयुष्य संपवल्याची माहिती
पोलिसाच्या आत्महत्येने वसईत खळबळ
मनोज तांबे, साम टीव्ही
वसईतून मोठी बातमी हाती आली आहे. वसई वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्याने स्वत:च्याच हाताने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्याने वसईत खळबळ उडाली आहे.
दयानंद पाटील (वय ३५) असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. दयानंद हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील आहेत. साप्ताहिक सुटीवर गेलेल्या दयानंद पाटील यांनी मंगळवारी दुपारी घरात कोणी नसताना परवानाधारक पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Shocking : धक्कदायक! डोळ्यात मिरची पूड टाकली, दगडाने डोकं ठेचून जिम मालकाची निर्घृण हत्याते गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे नैराश्यात होते. याच कारणातून त्यांनी टोकाचे पाऊल उचललेले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस कर्मचारी दयानंद पाटील यांच्या आत्महत्येने पोलिसांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
खेडमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
पुण्यातील खेड तालुक्यातील कोहिंडे आदिवासी निवासी आश्रम शाळेत दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पुण्यात मुलीनेच धारदार शस्त्राने बापाला संपवलं; धक्कादायक कारण समोरकोहिंडे आश्रम शाळेतील पायल शिवाजी पारधी या दहावीच्या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.