• कल्याण-डोंबिवलीतील कचरा डेपोमध्ये महिलेचा मृतदेह सापडला


  • घंटागाडीत कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह


  • दुर्गंधी आल्याने कर्मचाऱ्यांना हा प्रकार समजला


  • टिळकनगर पोलिस पुढील तपास करत आहेत


संघर्ष गांगुर्डे,कल्याण

कल्याणमध्ये घंटागाडीमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली. कल्याण-डोंबिवलीच्या कचरा डेपोमध्ये ही धक्कादायक घटना घडली. कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला. दुर्गंधी येत असल्याने तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या खांबालपाडा कचरा डेपो परिसरात सोमवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीत एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घंटागाडीतील कचऱ्याची विल्हेवाट लावत असताना कर्मचाऱ्यांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी तपासणी केली. यावेळी त्यांना महिलेचा मृतदेह आढळून आला.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे हे देखील पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविला आहे.

Dombivli : डोंबिवलीतील 29 कुटुंबांची चिंता वाढली! इमारत रिकामी करण्याची नोटीस, रहिवाशांची केडीएमसीत धाव

महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून ओळख पटल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एसीपी सुहास हेमाडे यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास टिळकनगर पोलिस करत असून महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला, तसेच मृतदेह घंटागाडीत कसा आला? याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

KDMC चा मोठा निर्णय! नोटरी घरांवरील कर नाव हस्तांतरणास हिरवा कंदील

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.