Monsoon Update : राज्यात यंदा पाऊस कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाने अजूनही संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात अजूनही पेरणी केलेली नाही. दरम्यान, आता हवामानाची माहिती देणारे पंजाबराव डख यांनी आगामी काळात पावसाची स्थिती कशी असेल, याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात पाऊस नेमका कसा असेल? शेतकऱ्यांना परेणी कधी करता येईल, याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे.
यंदाचे वर्ष सर्वात चांगले राहणारमहाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. परंतु आता मान्सून स्थिरावला आहे. अशी स्थिती दरवर्षी पाऊस पडल्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात असते. म्हणूनच शेतकऱ्यांना वाटत आहे की यावर्षी पाऊस पडणार नाही. दुष्काळ पडणार आहे, असे शेतकऱ्यांना वाटत आहे. परंतु शेतकऱ्यांना मी सांगतो की यंदाचे वर्ष सर्वात चांगले राहणार आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांगला म्हणजेच पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे, असे पंजाबराव डख म्हणाले आहेत.
परतीचा पाऊस धुमाकूळ घालणारतसेच, सर्वांच्या हळूहळू पेरण्या चालू होतील. या वर्षाच्या जून महिन्यात पाऊस कमी पडेल. परंतु जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल. ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी असेल. त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. परंतु दुष्काळ वगैरे काहीही पडणार नाही. यंदाचे साल हे शेतकरी हिताचे आहे. शेतकऱ्यांनी घाबरू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्यात कुठे आणि कधी पाऊस होईल?राज्यात 18 जूनच्या नंतर पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 20 ते 21 जूनच्या दरम्यान हा पाऊस मराठवाड्यात येईल. मराठवाड्यात 21 ते 29 जूनच्या काळात वेगवेगळ्या भागात पाऊस होईल. विदर्भात 18 ते 19 जूनपासूनच पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर तिथेही पेरण्या सुरू होतील. त्यानंतर हा पाऊस उत्तर उत्तर महाराष्ट्राकडे जाईल. उत्तर महाराष्ट्रात 23 जून ते 29 जूनच्या दरम्यान पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्रातही 23 जून ते 29 जूनच्या काळात पाऊस पडेल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
दुष्काळ पडणार नाहीदुष्काळ वगैरे काहीही पडणार नाही. शेतकऱ्यांनी भीती बाळगू नका. 19 जूनच्या नंतर उन्हाची तीव्रताही कमी होणार आहे. ढगाळ वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.