- सुनील जगताप
उरुळी कांचन - आज उरुळी कांचन येथे आज सायं. ५ च्या दरम्यान वळवाचा पाऊस झाला. पाऊस दहा-पंधरा मिनिटे पडला. परंतु, त्याने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इरिगेशन कॉलनी जवळील भागात तसेच चौधरी वस्तीजवळ या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले चेंबरच्या तोंडाला कचरा व गाळ साठल्याने पाणी रस्त्यावरच साठून राहण्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
विशेषतः त्या रस्त्यावरून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना पाण्याचा अडथळा निर्माण झाला. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्यावर पडलेले पाणी वाहून नेण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था केलेली आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वीची त्याची देखभाल दुरुस्ती न करण्याने त्यामध्ये जाणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साठते आणि या पाण्यामुळे विशेषता दुचाकी स्वारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून पावसाळ्यापूर्वी याची देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे असताना देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याने, याठिकाणी अपघात होऊन निष्पाप नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. याकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या बाबीकडे समाज हिताच्या दृष्टिकोनातून बघेल का? असा प्रश्न उपस्थित करत या ठिकाणी पाणी वाहून जाईल अशी सोय तातडीने करण्याची मागणी होत आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.