Inside story behind Rishabh Pant's move from LSG to DC : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ संपून एक-दीड महिना होतो, तेच खूप मोठी घडामोड घडताना दिसत आहे. रिषभ पंतला २७ कोटी देऊन आपल्या ताफ्यात घेणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सच्या पदरी काही यश आलेलं नाही. IPL 2026 च्या पर्वात त्यांना १४ सामन्यांपैकी केवळ ४ सामने जिंकता आले आणि ते १०व्या क्रमांकावर राहिले. LSG च्या सातत्याने अपयशाने फ्रँचायझीने कर्णधार रिषभशी फारकत घेतली आहे आणि हा यष्टिरक्षक-फलंदाज दुसऱ्या संघात दाखल होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.


रिषभला मागील दोन पर्वात प्रत्येकी १४ सामन्यांत २६९ व ३१२ धावा करता आल्या आहे. नेतृत्वाच्या जबाबदारीत रिषभला फलंदाजीतही अपयश आल्याने मालक संजीव गोएंका यांचे टेंशन वाढले होते आणि रिषभ हा भविष्यात रोहित शर्मा व महेंद्रसिंग धोनी या आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांच्या पंक्तीत बसेल, असा दावा करणारे गोएंका आता त्याला संघातून काढायला निघाल्याचे वृत्त आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग दिल्ली कॅपिटल्सच्या सेटअपमध्ये परतत असताना रिषभही त्याच दिशेने जातोय..

IND vs AFG 3rd ODI :भारताला क्लीन स्वीप करायचा असेल तर 'या' 3 गोष्टी कराव्याच लागतील; अफगाणिस्तानचा होणार सुपडा साफ!

दिल्ली कॅपिटल्सने पार्थ जिंदालच्या JSW संघाकडे पुढील दोन वर्षांसाठी फ्रँचायझीची सूत्रे येणार असल्याने, लखनौ सुपर जायंट्ससोबत एका ट्रेडची प्रक्रिया सुरू केली आहे. या करारानुसार, पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये परतणार आहे. २०२५ च्या आयपीएल लिलावापूर्वी त्याला संघातून मुक्त करण्यापूर्वी, त्याने याच फ्रँचायझीचे नऊ हंगाम प्रतिनिधित्व केले होते. रिषभसाठी DC कुलदीप यादवला LSG ला देणार आहेत. या खेळाडूंच्या अदलाबदलीमुळे पंत आणि कुलदीप या दोघांचेही एका अर्थाने मायदेशी पुनरागमन होईल.


या व्यवहाराच्या नेमक्या तपशिलाविषयी तात्काळ कोणतीही माहिती उपलब्ध नाही, परंतु रिषभ पंत आपल्या मानधनात मोठी कपात स्वीकारणार आहे. पंतच्या ट्रेडमधील सर्वात मोठा अडथळा म्हणजे त्याचा २७ कोटी रुपयांचा विक्रमी पगार होता. एवढ्या मोठ्या रकमेच्या खेळाडूला संघात सामावून घेणे कोणत्याही फ्रँचायझीसाठी तात्काळ शक्य नव्हते.

Virat Kohli IPL Future: विराट कोहली २०३० पर्यंत RCB सोबत राहणार का? फ्रँचायझीच्या CEO ने दिले त्याच्या IPL भवितव्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स...

हा बदल सुलभ करण्यासाठी पंतने आपल्या अपेक्षा कमी करण्यास सहमती दर्शवली, असे वृत्त क्रिकबजने दिले आहे. रिषभचे सुधारित मानधन त्याच्या सध्याच्या पगाराच्या निम्म्यापेक्षा किंचित जास्त असेल, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या यष्टीरक्षक-फलंदाजाने सुमारे १५ कोटी रुपयांच्या मानधनाला सहमती दर्शवली आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.