बीड : राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतानाचे चित्र पाहायला मिळत असून बीड (Beed) जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून केंद्रस्थानी आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात हत्याकांडाची घटना उघडकीस आली असून बॅनर फाडल्याच्या किरकोळ कारणावरुन ही हत्या झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये (nashik) एका इमारतीच्या टेरेसवर मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान, बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत असून पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.
केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरूणाची कदमवाडी फाटा परिसरातील हॉटेल गावकरी येथे रात्रीच्या सुमारास चाकुने भोसकून हत्या करण्यात आली. बॅनर फाडल्याच्या कारणावरून हा खून झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईकांसह गावकरी मोठ्या संख्येने केज पोलीस ठाण्यात दाखल झाले. यादरम्यान केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गावकरी व नातेवाईकांकडून दोनवेळा रास्ता रोकोचा प्रयत्न देखील करण्यात आला. दरम्यान, आता या प्रकरणात केज पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
नाशिकच्या कामगार नगर परिसरामध्ये इमारतीच्या टेरेसवर मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून नाशिकच्या महात्मा नगर कामगार नगर भागातील ही घटना आहे. तरुणाची हत्या करून मृतदेह पोत्यामध्ये भरून टेरेसवर ठेवल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. परिसरातील नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने शोध घेतला असता रात्री उशिरा पोत्यात मृतदेह असल्याचं समोर आलं. याच परिसरातील एक तरुण गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता, त्यामुळे, सदर मृतदेह या बेपत्ता तरुणाचा आहे की? आणखी कोणाचा? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेच्या आधारावर आतापर्यंत तीन ते चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.