लहान बाळासोबत प्रवास करणं जितका आनंददायी आणि सुखद अनुभव असू शकतो, तितकाच तो आव्हानात्मकही ठरू शकतो. बाळाला घेऊन पहिल्यांदाच घराबाहेर पडताना पालकांच्या मनात उत्सुकता आणि थोडी भीती अशा दोन्ही भावना असतात. ‘प्रवासात बाळ रडणार तर नाही ना?’, ‘त्याच्या खाण्यापिण्याचे काय होईल?’, किंवा ‘त्याची तब्येत बिघडली तर काय करावे?’ असे अनेक प्रश्न पालकांसमोर उभं राहतात. परंतु, योग्य नियोजन, संयम आणि पूर्वतयारी असेल तर लहान बाळासोबतचा प्रवास अत्यंत सुकर आणि अविस्मरणीय होऊ शकतो. चला तर मग आज जाणून घेऊयात लहान बाळासह प्रवास करताना काय काळजी घ्यायची,


एका महिन्याचं बाळ असेल तर शक्यतो प्रवास टाळा, कारण या वयात बाळाची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असते.


बाळ सहा ते आठ आठवड्यांचे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला घेऊन प्रवास करू शकता.
कारण या वयात बाळ आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला शिकलेला असतो.


प्रवासाला जाताना डायपर, कपडे, दूध, औषधं आदी गोष्टीसोबत ठेवा.


हेही वाचा – मुलांना कोणत्या वयात शिकवावे स्विमिंग, खेळ आणि म्युझिक


जर बाळाला आईच्या दुधावर असेल तर बाळाच्या आईने स्वत:ची काळजी घ्यावी. प्रवासात पौष्टिक आहार घ्यावा, पाणी उकळून प्यावे.


जर प्रवास लांबचा असेल तर बाळाच्या खाण्यापिण्याच्या वेळांकडे विशेष लक्ष द्यावे.


प्रवास करताना वातावरण जास्त थंड किंवा गरम असेल तर त्याप्रमाणे बाळाचे कपडे, खाणं पिणं याची काळजी घ्यावी.


बाळाला प्रवासाला घेऊन जाताना राखीव जागेची व्यवस्था करावी.


बाळाला कारने घेऊन जात असाल तर मध्ये ब्रेक घ्यावा, जेणेकरून बाळाला प्रवासाचा त्रास होणार नाही.


बाळ बॉटलने दूध पित असल्यास बॉटल स्वच्छ करावी.


बाळ प्रीमॅच्युअर असेल तर बाळाच्या श्वासोच्छवासावर प्रवासात विशेष लक्ष द्यावे.


बाळाला आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील किंवा काही उपचार सुरू असतील तर अशा परिस्थितीत बाळाला घेऊन प्रवास करू नये.


ज्या ठिकाणी बाळाला घेऊन जात आहात तेथे गेल्यावर बाळाची गैरसोय होणार नाही ना? याचा विचार करूनच प्रवासास निघावे.


हेही वाचा – का कमी होतोय मुलांचा पेशन्स आणि फोकस?



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.