इंडियन प्रीमियर लीग 2027 (IPL 2027) साठी ट्रेडिंग विंडो उघडली असून, पहिला ट्रेड दिल्ली कॅपिटल्स (DC & LSG) आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्या दरम्यान झाला आहे. या ट्रेडमध्ये ऋषभ पंतची (Rishbh Pant) दिल्ली कॅपिटल्समध्ये पुन्हा एन्ट्री झाली आहे, तर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आता दिल्लीकडून लखनऊ सुपर जायंट्समध्ये गेला आहे.
त्यातच आता अशी बाब समोर येत आहे की, स्टार खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik pandya) मुंबई इंडियन्ससोबतचे आपले नाते संपवू शकतो. दोन चॅम्पियन आयपीएल चॅम्पियन संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी या अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघात सामील करून घेण्यात रस दाखवला आहे. हार्दिक पंड्याच्या ट्रेडशी संबंधित प्रकरणाची माहिती असलेल्या एका आयपीएलच्या सूत्राने, नाव न सांगण्याच्या अटीवर रिपोर्टमध्ये सांगितले की, कोलकाता नाईट रायडर्सचे टॉप मॅनेजमेंट आणि मुंबई इंडियन्सचे मालक यांच्यात अनेकदा चर्चा झाली आहे. पांड्याचे मुंबई इंडियन्समध्ये परतणे चढ-उताराचे राहिले आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघ फक्त एकदाच प्लेऑफमध्ये पोहोचू शकला आहे.
रिपोर्टनुसार, अजिंक्य रहाणे हा कामचलाऊ कर्णधार होता आणि या हंगामानंतर त्याचे रिलीज होणे निश्चित आहे. केकेआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या हंगामाच्या शेवटी मुंबई इंडियन्सच्या मालकांशी चर्चा केली होती, परंतु रिलायन्सची वार्षिक एजीएम (AGM) जवळ असल्याने आयपीएल ट्रेडला प्राथमिकता दिली गेली नव्हती. तसेच, आता केकेआरने पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संवाद साधला असून काही फेऱ्यांच्या चर्चाही झाल्या आहेत, परंतु यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र निश्चित आहे की जर पांड्या केकेआरशी जोडला गेला, तर कर्णधारपद त्याच्याकडे असेल, कारण सध्या रिंकू सिंग (Rinku Singh) केकेआरच्या कर्णधारपदासाठी योग्य पर्याय वाटत नाही. तसेच, सूत्रांनी हे स्पष्ट केले नाही की पांड्याचा ट्रेड केवळ पैशांच्या बदल्यात होईल की एखाद्या खेळाडूच्या बदल्यात. आयपीएलच्या ट्रान्सफर नियमांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, कोणताही खेळाडू ट्रेडबाबत दुसऱ्या फ्रँचायझीशी वैयक्तिकरित्या चर्चा करू शकत नाही आणि नियमांनुसार, ट्रेड एका फ्रँचायझीकडून दुसऱ्या फ्रँचायझीकडे होऊ शकतो, परंतु त्यासाठी खेळाडूची संमती आवश्यक असते.
हार्दिकसाठी राजस्थाननेही रस दाखवला असून मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वालच्या बदल्यात हार्दिक पंड्याला ट्रेड करण्याचा प्रस्ताव मिळाला आहे, परंतु या ट्रेडसाठी चर्चा पुढे सरकली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रॉयल्स आसामचा स्टार रियान पराग याला दीर्घकालीन कर्णधार म्हणून पाहत आहे. अशा परिस्थितीत, पांड्याला राजस्थान रॉयल्समध्ये कर्णधारपद मिळणे कठीण आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.