बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






मालमत्तेच्या वादातून तोंडावर उकळते तेल टाकून तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना लातूरमध्ये घडली. याप्रकरणी मयत तरुणाच्या फिर्यादीवरून एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव मारुती दहीकांबळे असे मयत तरुणाचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील संत ज्ञानेश्वर नगर निडेबन येथील उद्धव दहीकांबळे याचे महिलेसोबत अनैतिक संबंध होते. तरुणाच्या वाटणीची जमीन आणि मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी महिला हट्ट करत होती. यावरून दोघांमध्ये 12 जून रोजी वाद झाला. यानंतर रात्री अडीचच्या सुमारास आरोपी महिलेने उकळलेले तेल त्याच्या तोंडावर टाकले. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी प्रथम उदगीर येथे नंतर लातूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना 22 जून रोजी पहाटे 4.30 वाजता त्याचा मृत्यू झाला.


याप्रकरणी तरुणाचे वडील मारुती नरसिंह दहीकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वंदना तुळशीराम मादळे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव बेंबडे हे करत आहेत.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.