पुणे : ग्राहकांना बनावट सौंदर्य प्रसाधनांची (काॅस्मेटिक्स) विक्री केल्याचा प्रकार अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) उघडकीस आणला. या प्रकरणी रविवार पेठेतील एका वितरकासह औषध विक्री दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एफडीएचे औषध निरीक्षक श्रीकांत पाटील (वय ३९) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ओम केमिस्टचे मालक गणेश पुनाराम चौधरी, तसेच माताजी ट्रेडर्स या वितरकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकात ओम केमिस्ट हे औषध विक्रीचे दुकान आहे. या दुकानातून सेटाफिल जनरल स्कीन केअर या उत्पादकाच्या बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री होत असल्याची माहिती एफडीएला मिळाली. रविवारी (ता. २१) एफडीएच्या पथकाने कारवाई केली. तेथून बनावट सौंदर्य प्रसाधन जप्त करण्यात आले.
चौकशीत रविवार पेठेतील एका वितरकाने बनावट सौंदर्य प्रसाधनाचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एफडीएच्या पथकाने औषध विक्रेत्यासह वितरकावर गुन्हा दाखल केला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.