India Women vs Bangladesh Women Marathi Cricket News: भारतीय महिला संघाची युवा गोलंदाज श्री चरणी हिने आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये इतिहास रचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या ( INDW vs BANW ) सामन्यात २ विकेट्स घेत तिने हा विक्रम केला आणि १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. राधा यादव व श्री चरणी यांनी बांगलादेशला १३६ धावांवर रोखले. २१ वर्षीय चरणी ही भारताकडून एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक १२ विकेट्स घेणारी आणि जगातील चौथी गोलंदाज ठरली.


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झेल सोडण्याचा किती फटका बसला, हे भारतीय महिला संघाला चांगलेच माहित्येय. तरीही बांगलादेशविरुद्ध करो वा मरो सामन्यात पहिल्या पाच षटकांत भारतीय खेळाडूंनी चार सोपे झेल सोडले आणि त्याचा फायदा जुआरिया फेर्डोस व सोभना मोस्तरी यांनी उचलून दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली.


त्याआधी रेणुका सिंगने दुसऱ्याच षटकात दिलारा अक्तेरला ( ४) बाद केले होते. स्पर्धेत डावाच्या पहिल्या सहा षटकांत तीन किंवा त्यापेक्षा जास्त झेल सोडण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीचा नकोसा विक्रमही भारताच्याच ( ३ झेल सोडले वि. पाकिस्तान) नावावर आहे.

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

नंदनी शर्माने ९व्या षटकात कॉट अँड बोल्ड घेत फेर्डोसला ( ३३) माघारी पाठवून ही जोडी तोडली. भारताविरुद्धट्वेंटी-२०त अर्धशतकीय भागीदारी करणारी ही तिसरी बांगलादेशी जोडी ठरली. यापूर्वी २०१८ मध्ये फर्गना हक व रुमाना अहमद यांनी नाबाद ९३ व २०२४ मध्ये रितू मोनी व शोरिफा खातून यांनी ५७ धावांची भागीदारी केली होती. राधा यादवने १३व्या षटकात बांगलादेशची दुसरी सेट फलंदाज सोभनाला ( २२) बाद करून मोठे यश मिळवून दिले.



कर्णधार निगर सुलताना २७ चेंडूंत ३२ धावांवर बाद झाल्यानंतर बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. राधा यादवने २८ धावांत ३ विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्माला ( ०-२३) विक्रमी विकेटसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल. श्री चरणीने १९ धावांत २ विकेट्स घेत या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक १० विकेट्सचा टप्पा ओलांडला. तिने वेस्ट इंडिजच्या आलिया आलेयन ( ८) हिला मागे सोडले. बांगलादेशला ८ बाद १३६ धावा करता आल्या.


Most wickets for India Women in a T20 WC edition



  • १२* - श्री चरणी (२०२६)


  • १० - पूनम यादव (२०२०)


  • ९ - डायना डेव्हिड (२०१०)


  • ८ - पूनम यादव (२०१४)


  • ८ - पूनम यादव (२०१८)


  • ८ - राधा यादव (२०१८)


IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

Most wickets in a Women’s T20 WC edition



  • १५ - अमेलिया केर (NZ-W, २०२४)


  • १३ - अन्या श्रुबसोल (ENG-W, २०१४)


  • १३ - मेगन शूट (AUS-W, २०२०)


  • १२ - नोंकुलुलेको म्लाबा (SA-W, २०२४)


  • १२ - श्री चरणी (IND-W, २०२६)


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.