India vs Ireland Vaibhav Sooryavanshi practice video: एरवी भारत-आयर्लंड मालिकेला इतकं महत्त्व कुणी दिलं नसतं, परंतु १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीमुळे या मालिकेवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. भारतीय संघ प्रथमच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. पुढील ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची तयारी म्हणून निवड समितीने सूर्यकुमार यादवकडून नेतृत्व काढून घेताना श्रेयसला कॅप्टन केले. त्यामुळे त्याच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेलच, परंतु सध्या वैभव हा केंद्रस्थानी आहे. शुक्रवारी होणाऱ्या सामन्याच्या तयारीसाठी भारतीय खेळाडूंनी आज कसून सराव केला अन् वैभवचे हे सीनियर संघासोबतचे पहिलेच सराव सत्र ठरले.
IPL 2026 मध्ये वैभवने सर्वाधिक ७७६ धावा करून ऑरेंज कॅप नावावर केली. काही दिवसांपूर्वी श्रीलंका अ विरुद्धच्या फायनलमध्ये त्याने ११ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून लिस्ट ए क्रिकेटमधील वेगवान अर्धशतकाचा विक्रम नावावर केला. तो आयपीएलच नव्हे तर देशांतर्गत व विविध वयोगटातील सामन्यांत आपली छाप सोडतोय आणि त्यामुळेच भारताच्या ट्वेंटी-२० संघात त्याचा समावेश केला गेला. उद्या त्याने पदार्पण केल्यास, तो भारताकडून पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरले. १५ वर्ष व ९१ दिवसांचा वैभव महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडले.
Vaibhav Sooryavanshi: १५ वर्षीय वैभवबाबत राहुल द्रविडचं मोठं विधान; म्हणाला, तुम्ही कोणत्याही मुलाला...दरम्यान, वैभवचे आज भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र झाले. वैभव मैदानावर येताना एकटाच चालताना दिसला.. अन्य खेळाडू एकमेकांसोबत मैदानात दाखल झाले. यावेळी वैभवला पाहण्यासाठी काही भारतीय चाहत्यांनी उपस्थिती दाखवली होती. वैभव शांतपणे मैदानावर दाखल झाला. त्यानंतर त्याने इशान किशनसोबत नेट्समध्ये अक्षर पटेल व रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर सराव केला. इशान त्याला काही टिप्सही देताना दिसला.
भारत संघ - अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
आयर्लंड संघ - लॉर्कन टकर (कर्णधार), रॉस अडायर, बेन कॅलिट्झ, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, मॅथ्यू हम्फ्रीज, गॅविन होए, मॅथ्यू हॉलार्ड, लियाम मॅकार्थी, जय मूंद्रा, हॅरी टेक्टर, टिम टेक्टर, रुबेन विल्सन
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.