कोण आहे जय मुंद्राने T20I पदार्पणात इतिहास रचला: भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात एक अनोखा इतिहास रचला गेला आहे. आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या 29 वर्षीय जय मुंद्राने आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर भारताचा स्टार फलंदाज संजू सॅमसनचा त्रिफळा उडवून सर्वांना थक्क केले. मूळचा भारतीय असलेला जय मुंद्रा उच्च शिक्षणासाठी आयर्लंडला गेला होता आणि आता तो थेट तिथल्या राष्ट्रीय संघाकडून भारताच्याच विरुद्ध खेळत आहे.


पहिल्याच चेंडूवर विकेट घेत रचला इतिहास


डावखुरा वेगवान गोलंदाज जय मुंद्रा भारताच्या डावातील दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. त्याने ताशी 139 किमी वेगाने टाकलेला पहिलाच चेंडू संजू सॅमसनच्या बॅटची कडा घेऊन थेट स्टंप्सवर आदळला. सॅमसन अवघ्या 5 धावा करून बाद झाला. या ऐतिहासिक विकेटसह जय मुंद्रा आयर्लंडसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा इतिहासातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. बेलफास्ट (2026) येथे झालेल्या या सामन्यात त्याने हा पराक्रम केला. यापूर्वी 2023 मध्ये मॅथ्यू हम्फ्रीजने बांगलादेशविरुद्ध अशी कामगिरी केली होती.



राजस्थान ते आयर्लंड…. कसा राहिला जयचा प्रवास? (Who Is Jai Moondra Creates History On T20I Debut)


जय मुंद्राचा जन्म 10 जानेवारी 1997 रोजी राजस्थानमधील टोंक येथे झाला. लहानपणापासूनच त्याला अभ्यासासोबत क्रिकेटची आवड होती. तो राजस्थानच्या अंडर-14 संघातून खेळला असून त्याने अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. सुरुवातीला टेनिस बॉलने क्रिकेट खेळणाऱ्या जयने नंतर लेदर बॉलने सराव सुरू केला.


2021 मध्ये जय एम.टेक (M.Tech) च्या शिक्षणासाठी स्टुडंट व्हिसावर आयर्लंडला गेला. तिथे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला चांगल्या कंपनीत नोकरीही मिळाली. नोकरी सांभाळत त्याने डब्लिनमधील प्रसिद्ध लेनस्टर क्रिकेट क्लबमध्ये खेळणे सुरू ठेवले. 2023 च्या आयरीश सीनियर कप विजेत्या संघातही त्याचा समावेश होता. आयर्लंडचे मुख्य गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्यामुळे जयला राष्ट्रीय संघात संधी मिळाली आणि त्याने पहिल्याच सामन्यात आपले नाव सुवर्णअक्षरात कोरले.


चुलत भाऊ खेळतो स्वीडनसाठी!


जयच्या कुटुंबाला क्रिकेटची मोठी पार्श्वभूमी आहे. जयचा चुलत भाऊ (काकांचा मुलगा) अजय मुंद्रा हा स्वीडन देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. विकेटकीपर-फलंदाज असलेल्या अजयने स्वीडनसाठी 31 टी-20 सामने खेळले असून 30.50 च्या सरासरीने 793 धावा केल्या आहेत. यात 5 अर्धशतकांसह विकेटच्या मागे 38 कॅच आणि 2 स्टम्पिंगची नोंद आहे. एकाच कुटुंबातील दोन भाऊ दोन वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असणे, हा एक दुर्मिळ योग म्हणावा लागेल.


हे ही वाचा –


Vaibhav Sooryavanshi : 15 वर्षांच्या पोराला भारताच्या जर्सीत पाहण्यासाठी चाहते आतूर, पण मॅचमध्ये घडलं भलतंच; पदार्पण न करताही वैभवने जिंकली मनं





Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.