वैयक्तिक कर्ज वि क्रेडिट कार्ड नवी दिल्ली : अनेकदा अचानक आलेल्या अडचणीमुळं तातडीनं पैशांची व्यवस्था करावी लागते. वैद्यकीय अडचण किंवा आर्थिक अडचणीमुळं तातडीनं पैसे लागतात. यावेळी लोकासमोर कोणाकडून उसने पासे घेणे किंवा वैयक्तिक कर्ज घेणे अथवा क्रेडिट कार्डचा वापर करणे हा पर्याय असतो. वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डवर लगेचच पैसे मिळतात मात्र, दोन्हींची पद्धत आणि खर्च वेगळा असतो.
वैयक्तिक कर्ज बँकेकडून अथवा वित्तीय संस्थेकडून घ्यावं लागतं. याची परतफेड दरमहा ईएमआयद्वारे करावी लागते. या कर्जाचे व्याज दर निश्चित असतात. त्यामुळं दरमहा किती ईएमआय भरायचा आहे हे देखील कर्जदाराला माहिती असतं. तर, क्रेडिट कार्डवर एक क्रेडिट लिमिट मिळते, ज्याचा वापर गरज असेल तेव्हा करता येतो. यानंतर निश्चित तारखेला पूर्ण रक्कम भरावी लागते. निश्चित तारखेपर्यंत रक्कम जमा केल्यास व्याज द्यावं लागत नाही. मात्र, त्यानंतर पैसे भरल्यास व्याज किंवा इतर चार्जेस द्यावे लागतात.
जर तुमचा खर्च 2 लाख ते 5 लाख रुपये असेल तर तुम्हाला वैयक्तिक कर्जाचा पर्याय चांगला आहे. या रकमेच्या परतफेडीसाठी ईएमआय निश्चित असतो. यामुळं परतफेड करणं सोपं असतं. तर, जर तुम्हाला 10 किंवा 20 हजारांची गरज असेल आणि पुढील महिन्यात पगार आल्यावर तुम्ही ते पुन्हा भरु शकत असाल तर क्रेडिट कार्डचा पर्याय चांगला आहे. यासाठी कर्ज काढावं लागत नाही पैसे लगचेच मिळतात.
वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड यापैकी कोणता पर्याय फायदेशीर यासंदर्भात विचार करायचा असल्यास कर्ज किंवा क्रेडिट कार्ड निवडताना व्याज दरासोबत प्रोसेसिंग फी, ईएमआयला उशीर झाल्यास होणारा दंड, क्रेडिट कार्डचे लेट पेमेंटचे चार्जेस, फायनान्स चार्जेस आणि इतर फी देखील पाहावी. यासाठी खर्च करताना तो विचारपूर्वक केला पाहिजे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.