मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना लाभांश कमावण्याची मोठी संधी आहे. चार कंपन्यांच्या लाभांशाची रेकाॅर्ड तारीख सोमवार, २९ जून रोजी आहे. या तारखेला हे शेअर्स एक्स-डिव्हिडंड व्यवहार करतील. रेकाॅर्ड तारखेला या कंपनीचे शेअर्स असणारे गुंतवणूकदारच लाभांश मिळण्यासाठी पात्र ठरतील.
कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल
कल्पतरू प्रोजेक्ट्सने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ११ रुपयांचा केला आहे. यासाठी रेकाॅर्ड तारीख २९ जून आहे. लाभांशाला १५ जुलै रोजी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांची मंजुरी घेतली जाईल. मंजुरी मिळाल्यास लाभांशाचे वितरण १३ ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वी केले जाईल. बीएसईवर शेअरची किंमत १३८२ रुपये आहे.
ज्योती लॅब्स
कंपनीने मे महिन्यात २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ३. ५० रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. १४ जुलै रोजी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांची मंजुरी घेतली जाईल. मंजुरी मिळाल्यास १४ जुलै रोजी किंवा त्यानंतर पेमेंट केले जाईल. शेअरची किंमत सध्या २००. ६० रुपये आहे.
रेमंड लाइफस्टाइल
कंपनी आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी प्रति शेअर १ रुपयांचा अंतिम लाभांश देणार आहे. लाभांशाला १४ जुलै रोजी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांची मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर पेमेंट केले जाईल. बीएसईवर ची किंमत ९५. ९५ रुपये आहे.
अंसाई नेरोलॅक पेंट्स
कंपनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर २. ५० रुपये अंतिम लाभांश देणार आहे. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा ९ जुलै रोजी होईल. यावेळी भागधारकांची मंजुरी घेतली जाईल. मंजुरी मिळाल्यास लाभांशाचे वितरण १४ जुलै रोजी किंवा त्यानंतर केले जाईल. बीएसईवर शेअरची किंमत सध्या २१२. ३० रुपये आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.