Mumbai weather update today : मुंबईसह एमएमआर क्षेत्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील पाच दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली. कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राने आज दुपारी जारी केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, या काळात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मुंबईत आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यतेसह काही ठिकाणी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला होता; मात्र रात्री अधूनमधून आलेल्या सरींनंतर दिवसभर पावसाने उघडीप घेतली. पुढील दोन दिवसांत म्हणजे सोमवार आणि मंगळवार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Update: मान्सूनची आगेकूच! महाराष्ट्रात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; IMD ची मोठी अपडेट

या काळात विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची ‘दाट शक्यता’ वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर ​१ व २ जुलैला मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून सोसाट्याचा वारा कायम राहील.


​​मुंबईसोबतच शेजारील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतही पुढील पाच दिवस हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ठाण्यात आजपासूनच ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, १ आणि २ जुलै रोजी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघरमध्ये उद्यापासून (ता. २९) वाऱ्याचा वेग वाढून तो ४०-५० किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे. तसेच जुलैच्या पहिल्या दोन दिवसांत पालघरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर वाढणार! मुंबईसह २३ जिल्ह्यांना अलर्ट, हवामान विभागाचा नवा अंदाज

पुढील काही दिवस मुंबई आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्यावा. तसेच समुद्रकिनाऱ्यालगत आणि झाडांखाली उभे राहणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.