Ireland vs India, 2nd T20I Marathi Cricket Update: भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराश केले... संजू सॅमसन व अभिषेक शर्मा, हे दोन्ही सलामीवीर भोपळ्यावर बाद झाले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर हा १० धावांवर बाद झाला आणि या तिघांना भारतात जन्मलेला, परंतु आयर्लंडकडून खेळणाऱ्या जय मुंद्रा ( Jai Moondra ) याने माघारी पाठवले. त्यात इशान किशन व तिलक वर्मा यांच्यात चुकलेल्या ताळमेळाचा फायदा आयर्लंडने उचलला. इशान रन आऊट होऊन माघारी परतला.


पदार्पण प्रिंस यादवने भेदक मारा करताना आयर्लंडला ८ बाद १५४ धावांवर रोखले. हॅरी टेक्टरने ४७ चेंडूंत ५३ धावांची खेळी करताना बेन कॅलित्झसह ( ३७) चौथ्या विकेटसाठी ६५ धावा जोडल्या. ही भारताविरुद्ध आयर्लंडकडून झालेली दुसरी सर्वोत्तम बागीदारी ठरली. यापूर्वी २०२२ मध्ये स्टीर्लिंग व बालबर्नी यांनी ७२ धावा जोडल्या होत्या. भारत-आयर्लंड यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२०त १७ खेळाडू झेलबाद झाले होते आणि ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील संयुक्तपणे अव्वल आकडेवारी आहे. आजच्या सामन्यात पहिल्या डावात ७ फलंदाज झेलबाद झाले आहेत.

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

प्रिंसने २२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या आणि भारताकडून ट्वेंटी-२० पदार्पणात जलदगती गोलंदाजाची ही पाचवी सर्वोत्तम कामगिरी ठरली.



  • ४/१० बरिंदर स्रान विरुद्ध झिम हरारे २०१६


  • ४/२२ शिवम मावी वि एस एल वानखेडे २०२३


  • ३/९ भुवनेश्वर कुमार विरुद्ध पाक बेंगळुरू २०१२


  • ३/१७ नवदीप सैनी वि डब्ल्यूआय लॉडरहिल २०१९


  • ३/२२ प्रिन्स यादव विरुद्ध इरे बेलफास्ट २०२६*


  • २/२३ जसप्रीत बुमराह विरुद्ध ऑस ॲडलेड २०१६



लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताला पहिल्या षटकात दोन धक्के बसले. जय मुंद्राच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसन पायचीत झाला आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर हॉलार्डने शॉर्ट थर्डवर अविश्वसनीय झेल घेताना अभिषेक शर्मालाही भोपळ्यावर माघारी जाण्यास भाग पाडले. श्रेयस १० धावांवर जयच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. इशान पाचव्या षटकात १२ धावांवर रन आऊट झाला.

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

पहिल्या सहा षटकांत भारताच्या चार विकेट पडण्याची ही १३ वी घटना असून आयर्लंडविरुद्धची ही पहिलीच वेळ आहे. आयर्लंडविरुद्ध भारताची सहा षटकांतील ४१ ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे, जी केवळ २०२४ मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या ३९/१ या धावसंख्येपेक्षा कमी आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.