क्रिकेट विश्वातून या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत 2028 पासून क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. या क्रिकेट खेळासाठी आयसीसी आणि ऑलिम्पिक समितीकडून पात्रतेसाठी अटी जाहीर केल्या आहेत. लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या 2028 च्या ऑलिम्पिकसाठी पात्रता काय असणार? हे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी पात्रता फेरीचं आयोजन करण्यात येणार आहे.


लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील क्रिकेट सामने हे टी20I फॉर्मेटने होणार आहेत. या स्पर्धेत महिला आणि पुरुषांचे 6-6 संघ सहभागी होणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे आशिया, आफ्रिका, युरोप आणि या खंडातील क्रिकेट संघाचा सहभाग या स्पर्धेत असणार आहे. क्रिकेटच्या कमबॅकमुळे ऑलिम्पिक स्पर्धेची क्रेझ आणखी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

4 संघ क्वालिफाय

या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 4 महिला संघ निश्चित झाले आहेत. आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या आधारावर 4 संघ ठरवण्यात आले आहेत. नियमांनुसार, 4 वेगवेगळ्या खंडातून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघाची ऑल्मिपिकसाठी निवड करण्यात आली आहे. आशियातून टीम इंडिया, ओशनियातून ऑस्ट्रेलिया, यूरोपमधून इंग्लंड आणि आफ्रिकेतून दक्षिण आफ्रिका हे 4 संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरले आहेत. पाकिस्तान पात्र ठरलेली नाही. तर 2 संघ क्वालिफाय राउंडमधून निश्चित होतील.

यजमान अमेरिकेला लॉटरी!

अमेरिका या स्पर्धेची यजमान आहे. त्यामुळे या स्पर्धेत अमेरिकेच्या महिला आणि पुरुष क्रिकेट संघाला थेट प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यात एक अट आहे. अमेरिकेचे दोन्ही संघ 30 जून ते 31 डिसेंबर 2026 दरम्यान आयसीसी टी 20I रँकिंगमध्ये पहिल्या 15 मध्ये असायला हवेत. दोन्ही संघ या रँकिंगमध्ये नसल्यास त्यांना थेट प्रवेश मिळणार नाही. तर त्या जागी सर्वोत्तम संघाला संधी देण्यात येईल.

सहावा संघ कसा ठरणार?

दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 6 पैकी 5 संघ हे आयसीसी क्रमवारीच्या आधारावर निश्चित होणार आहे. मात्र सहावा आणि अंतिम संघ कसा निश्चित होणार? हा प्रश्न आहेत. याबाबत जाणून घेऊयात.


ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सहावा संघ निश्चित करण्यासाठी आयसीसीकडून ‘ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धा’ खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये एका जागेसाठी चुरस असणार आहे. विजेता संघ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरेल.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.