पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने १ जुलैपासून पेट्रोल आणि डिझेल खरेदीवरील २०० लिटरची कमाल मर्यादा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार कितीही इंधन खरेदी करता येणार आहे. विशेषतः ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी संबंधित वाहनचालकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.


सरकारने १२ जून रोजी रिटेल पेट्रोल पंपांवरून होणाऱ्या इंधन विक्रीवर निर्बंध लागू केले होते. त्या नियमानुसार, एका वाहनाला एका दिवसात जास्तीत जास्त २०० लिटर पेट्रोल किंवा डिझेलच भरता येत होते. या मर्यादेमुळे मोठ्या मालवाहू वाहनांचे चालक, ट्रान्सपोर्ट कंपन्या आणि जास्त इंधनाची गरज असलेल्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

Petrol-Diesel Rate: मोठी बातमी! पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदीवर ९० दिवसांची बंदी; केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, पण कुणासाठी?

ही मर्यादा लागू करण्यामागे सरकारचा उद्देश मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करणाऱ्या घाऊक ग्राहकांना मर्यादा आणणं हा होता. काही घाऊक ग्राहक रिटेल पंपांवरून मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करत असल्याने सामान्य ग्राहकांसाठी इंधनाची उपलब्धता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी २०० लिटरची मर्यादा लागू करण्यात आली होती.


मात्र, आता बाजारातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सरकारने हा निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ जुलैपासून देशभरातील रिटेल पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीवर कोणतीही २०० लिटरची मर्यादा राहणार नाही.

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

या निर्णयामुळे विशेषतः लांब पल्ल्याच्या वाहतुकीत कार्यरत ट्रक चालक, बस ऑपरेटर आणि व्यावसायिक वाहनधारकांना मोठा फायदा होणार आहे. गरजेनुसार एकाच वेळी इंधन भरता येणार असल्याने वेळेची बचत होणार आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.