पुणे : पुणे-नगर रस्त्यावरील यादव पेट्रोल पंपाशेजारी एका ह्युंदाई कारच्या स्पेअर पार्टच्या दुकानाला सोमवारी (ता. २९) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील सर्व स्पेअर पार्ट जळून खाक झाले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर रस्त्यावर यादव पेट्रोल पंपाच्या शेजारी ह्युंदाई स्पेअर पार्टची इमारत आहे. आज अचानक या इमारतीला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी येरवडा आणि पीएमआरडीएचे अग्निशामक बंब, पाण्याचे टँकर मदतीसाठी पाचारण करण्यात आले. जवानांनी होज पाईपच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये दुकानातील ह्युंदाई कंपनीचे स्पेअर पार्ट जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.