सुनील जगताप,


उरुळी कांचन : वटपौर्णिमेचे औचित्य साधून ट्री टॉक फाऊंडेशन व दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बकोरी देवराई वनराई प्रकल्पात वडाच्या वृक्षाचे वृक्षारोपण व पूजन करण्यात आले.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) डॉ.यशवंत माने यांनी दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठानच्या वृक्षसंवर्धन व जलसंधारणाच्या कार्याचे विशेष कौतुक केले.बकोरी व केसनंद परिसरातील खडकाळ डोंगरमाथ्यावर गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने वृक्षारोपण व संवर्धनाचे काम सुरू असून,आजपर्यंत एक लाखांहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे.त्याचबरोबर सुमारे ५ कोटी लिटर वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरविण्याचे महत्त्वपूर्ण जलसंधारणाचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे.


या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे केले जातात.दसऱ्याला आपट्याचे झाड,दत्तजयंतीला उंबराचे झाड तर वटपौर्णिमेला वडाचे झाड लावून त्याचे पूजन केले जाते.या उपक्रमात अनेक महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतात.प्रकल्पात छत्रपती जलाशयाची निर्मिती,७० टक्के औषधी वनस्पतींची लागवड,तसेच ४ हजार चौरस फुटांमध्ये ४ हजार झाडांचा "अकीरा मियावाकी" प्रकल्प उभारण्यात आला आहे.आज या वनराईत हजारो पक्ष्यांचे अधिवास निर्माण झाले असून त्यांच्यासाठी नियमित खाद्याची व पाण्याची व्यवस्था केली जाते.चंद्रकांत वारघडे व त्यांचे कुटुंब गेल्या दहा वर्षांपासून या संपूर्ण वनराईचे निस्वार्थपणे संगोपन करीत आहे.


यावेळी डॉ.यशवंत माने(उपविभागीय अधिकारी,हवेली),शेखर शेलार (गटविकास अधिकारी), तृप्ती कोलते (अप्पर तहसीलदार लोणी काळभोर), निलेश रासकर (उपकार्यकारी अभियंता,महावितरण),नंदकुमार गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक),अरुण पुजारी(सहायक अभियंता महावितरण) प्रमोद रासकर(वनपरिमंडल अधिकारी पुणे),संदीप जिंगाडे(मंडल अधिकारी)अंकुश कचरे,अनिल राठोड(वनरक्षक)संजय गारकर(तलाठी)मनिषा इंगळे(ग्रामसेवक)आदी मान्यवर उपस्थित होते.वनराई प्रकल्पाची सविस्तर माहिती वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांनी दिली व सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.