कन्नड: छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कन्नड तालुका विविध कार्यकारी सोसायटी (प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास संस्था) मतदारसंघात अखेर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. आमदार संजना जाधव यांच्या उमेदवारीवर तीव्र आक्षेप घेत उच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा देणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पांडुरंग घुले आणि चिकलठाणचे सरपंच तथा बाजार समितीचे संचालक युवराज चव्हाण यांनी अखेर आपल्या 'तलवारी म्यान' केल्या आहेत.

Heritage Tourism: जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान आणि करसवलतींचा लाभ, काय आहे योजना ?

रविवारी (ता. २८) औराळा येथे झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन घुले यांनी आमदार संजना जाधव यांना आपला बिनशर्त व जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. यामुळे आमदार जाधवांच्या विजयाचा मार्ग आता कमालीचा सुखकर झाला आहे. यापूर्वी उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी जिल्हा निबंधकांनी आक्षेपानुसार आमदार जाधवांचा अर्ज बाद केला होता. मात्र, आमदार जाधवांनी उच्च न्यायालयात धाव घेत कायदेशीर लढा दिला आणि न्यायालयाने त्यांची उमेदवारी कायम ठेवत त्यांना मोठा दिलासा दिला.


न्यायालयाच्या निकालानंतर राजकीय सामंजस्याची भूमिका घेण्यात आली. औराळा येथील बैठकीत आमदार संजना जाधव यांनी दोघांशी संवाद साधून अवघ्या काही मिनिटांतच त्यांची यशस्वी समजूत काढली. याबाबत युवराज चव्हाण यांच्या शी संपर्क केला असता त्यांनी बोलताना सांगितले किं पालकमंत्री संजय शिरसाठ, खासदार संदिपान सुमारे, माजी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य केतन कांदे यांच्या आदेशानुसार मी माझी उमेदवारी पाठीमागे घेऊन आमदार संजना जाधव यांना बिनशर्त पाठींबा देतो आहे असे सांगितले.

Makhan Malai: ना रबडी, ना आईस्क्रीम... तोंडात विरघळणारी सीतापूरची 'मक्खन मलाई' आहे खास का? केसर, खवा अन् सुक्या मेव्याचा अद्भूत मिलाफ

प्रकाश घुले यांनी जाहीर पत्र प्रसिद्ध करत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. ओबीसी कल्याण मंत्री अतुलजी सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील 'शेतकरी विकास पॅनल'तर्फे कन्नड मतदारसंघातून आमदार संजना जाधव यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार व आदेशाचा आदर ठेवून, मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला असून जाधव यांना माझा पूर्ण आणि जाहीर पाठिंबा देत आहे असे पत्रात म्हटले आहे .

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.